Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय आहे कमी आणि अधिक वयाचे रहस्य

काय आहे कमी आणि अधिक वयाचे रहस्य
कधी विचार केला आहे की मनुष्य आणि काही जनावर अधिक वर्षापर्यंत जिवंत राहतात जेव्हाकि काही पक्षी आणि जनावरांचे वय कमी असतं. हा प्रश्न वैज्ञानिकांसाठीदेखील शोधाचा विषय राहिला आहे. अलाहाबाद विद्यापीठ संशोधक संघाने आपल्या अध्ययनात याचे रहस्य उलघडत कारण स्पष्ट केले आहे.
 
मनुष्य असो जनावर वा पक्षी, त्यांचे तंतू न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन, लिपिड्स आणि काब्रोहाइड्रेट्स सारखे जैविक अणूंनी बनलेले असतात. सर्वांच्या जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. अशात प्रश्न उद्भवतो की काही प्राणी अधिक जगतात तर काही लवकर का मरतात?
अध्ययनात माहीत पडले आहे की याचे कारण प्लाझ्मा मेम्बरेन रेडोक्स सिस्टम (पीएमआरएस) आहे. हे शरीरात एक असे मॅकेनिज्म आहे जे ऑक्सिजनला पेशींमध्ये पोहचवण्यात लागणाऱ्या श्रमाच्या नुकसानाची भरपाई करतं. मनुष्य, जनावर किंवा पक्षी असो, वय वाढत असताना नुकसान भरपाईची क्षमता घटत जाते.
 
ज्यांच्या शरीरात पीएमआरएस मॅकेनिज्म योग्यरीत्या कार्य करतं ते अपेक्षाकृत अधिक जगतात. तज्ज्ञांप्रमाणे द्राक्ष, सफरचंद, कांदा आणि ग्रीन टी या पदार्थांमध्ये बायो ऍक्टिव मालीक्यूल आढळतात. याचे सेवन केल्याने पीएमआरएस मॅकेनिज्म आणखी योग्यरीत्या कार्य करतं. वय वाढले तरी हे पदार्थ सेवन करणार्‍यांची क्षमता अधिक असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

थं‍डीत अस जपा मुलांना...