Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

की बोर्ड चे बटणं वर्णमाला क्रमात का नसतात जाणून घेऊ या

की बोर्ड चे बटणं वर्णमाला क्रमात का  नसतात जाणून घेऊ या
, रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)
की बोर्ड हे टाईप रायटर चे संशोधित रूप आहे. टाईप रायटर चा शोध 1868  साली लॅथमशोल्स ने लावला होता. सुरुवातीच्या काळात ह्याचे बटण ए बी सी डी , या मालिकेत होते.परंतु या बटणाचा मदतीने टाइपिंग करणे कठीण होते या मुळे त्यांच्या मध्ये सुधारणा करण्यात आली आणि की बोर्डामध्ये बरेच बदल केले गेले. सर्वप्रथम त्या अक्षरांची निवड केळी गेली जे सर्वात जास्त वापरण्यात येतात.नंतर त्यांना बोटांच्या क्रमवारीने वापरण्याच्या स्वरूपात क्रमात लावले आणि 1873 साली शोल्स ने एका नव्या पद्धतीचे बटण असलेले टाईप रायटर बनविले ह्याचे नाव Q,W,E,R,T,Y (क्वर्टी) असे ठेवले.नंतर हे मॉडेल शोल्स कडून 
रेमिंग्टन आणि सन्स ह्याने विकत घेतले आणि 1874 मध्ये बरेच कीबोर्ड बाजारपेठेत आणले आणि जेव्हा संगणक विकसित झाला तेव्हा लोकांच्या सोयीनुसार कम्प्युटर मध्ये देखील हेच की बोर्ड वापरण्यात आले . की बोर्ड आणि टाईप रायटर च्या बटणामध्ये अंतर असते. हेच कारण आहे की बोर्डचे बटण वर्णमालाच्या मालिकेत नसतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाहतुकीचे नियम, कलमांची माहिती जाणून घेऊ या