Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हाईटहॅट जूनियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ

Whitehat Jr. started
, मंगळवार, 16 एप्रिल 2019 (16:18 IST)
व्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, जे माजी डिस्कवरी नेटवर्क्स इंडियाच्या प्रमुखांनी लॉन्च केली आहे आणि अग्रगण्य व्हेंचरिस्ट भांडवलदार - नेक्सस व्हेंचर पार्टनर्स आणि ओमिडियार नेटवर्क इंडिया यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ५०,००० ट्रायल्ससह, दररोज ५०० ऑनलाइन क्लास घेतले जातात, ४००% मासिक विद्यार्थी वाढ होत आहे व्हाईटहॅट जूनियर भारतातील मुलांसाठी 'कोडिंग' चळवळ चालवित आहे. या शैक्षणिक प्रणालीमध्ये पदवीधर झालेल्या ९ वर्षाच्या व्योम बग्रेचा या मुलाने स्वतःचे स्टोअर वरून डाउनलोड करण्याजोगे अँप बनवले आहे. प्रचंड वाढीच्या मागणीमुळे व्हाइटहॅटने १३ -१४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी व्यावसायिक कोर्स सुरू करणार आहे.  
 
जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील आवड आता भारतातील मुलांमध्ये सुद्धा वाढत आहे. तंत्र क्रांतीच्या उंबरठ्यावर, मुलांच्या तर्कशास्त्र आणि सर्जनशीलतेत रुपांतर करण्यास मुलांना कोडिंग कशा प्रकारे मदत करते याचा भारतीय पालकांनी स्वीकार केला आहे. एडटेक फर्म 'व्हाईटहॅट जुनिअर' ने बीटा टप्प्यात अभूतपूर्व संख्येने नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. व्हाईटहॅट जूनियर सध्या तीन स्तरांवर कोर्स देत आहे त्यामध्ये बिगिनर, इंटरमीडिएट, ऍडव्हान्स. कोडिंगची मूलभूत माहिती, तर्कशास्त्र, संरचना, क्रमवार, कमांड आणि कठीण गेम बनविण्यासाठी  अल्गोरिथीमिक वैचारिक पद्धत, अनिमेशन आणि अँप असे अभ्यासक्रम वन टू वन ऑनलाईन शिकवले जाते.
 
व्हाईटहॅट जूनियरचे संस्थापक आणि सीईओ करण बजाज म्हणाले कि, "मुलांसाठी कोडिंगसारख्या उदयोन्मुख विषयावर पालकांनी दर्शविलेल्या प्रतिसादाने आम्ही खूप समाधानी आहोत. उत्तम अनुभवी शिक्षकांद्वारे मुलांना प्रशिक्षण दिले जाते. व्हाईटहॅट आपल्या अभ्यासक्रमात चौथा अभ्यासक्रम सुरू करणार आहे, ज्यामध्ये १३ -१४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी व्यावसायिक पातळीवरील अभ्यासक्रम असेल".

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही