Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोटं मोडल्यावर का येतो आवाज?

बोटं मोडल्यावर का येतो आवाज?
विचित्र असली तरी लोकांना एक सवय असते ती म्हणजे हाताची बोटं मोडायची त्याने येणारा कटकट आवाज बहुतेक आवडत असावा परंतू प्रश्न हा आहे की बोटं मोडल्यावर असा आवाज येतो तरी कसा?
 
अमेरिका आणि फ्रान्स येथील शोधकर्त्यांप्रमाणे गणिताच्या तीन समीकरण याचे कारण सांगण्यात मदत करतील. त्या मॉडलप्रमाणे हाडांमध्ये आढळणार्‍या द्रव पदार्थांत तयार होणार्‍या वायूंचे बुडबुडे फुटल्यामुळे हा आवाज येतो.
 
आश्चर्य म्हणजे या प्रक्रियेवर एक संपूर्ण शतकापर्यंत वाद होत राहिला. फ्रान्समध्ये विज्ञानाचा विद्यार्थी विनीत चंद्रन सुजा वर्गात आपले बोटं मोडत असताना त्याला याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली. त्याने आपल्या अध्यापक डॉ. अब्दुल बरकत यांच्यासोबत गणिती समीकरणांची एक शृंखला तयार केली ज्यामुळे ही आवाज का आणि कशी येते कळू शकेल.
 
बुडबुडे फुटतात
त्यांच्याप्रमाणे, "पहिल्या समीकरणात कळले की बोटं मोडताना आमच्या हाडांच्या ज्वाइंट्समध्ये होणार्‍या वेगवेगळ्या दबावामुळे होतं.
 
"दूसर्‍या समीकरणाप्रमाणे वेगळ्या दबावात बुडबुड्याचा आकारही वेगळा असतो."
"तिसर्‍या समीकरणात त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे बुडबुडे, आवाज करणार्‍या बुडबुड्याच्या आकारासोबत जोडले."
 
चंद्रन सुजा यांनी सांगितले की या समीकरणांमुळे पूर्ण गणित मॉडल तयार झाले.
 
आपले बोटं मोडत असताना आम्ही आपले ज्वाइंट्स खेचत असतो. असे करताना दबाव कमी होतो. बुडबुडे द्रव रूपात असतात ज्यांना सिंनोविक फ्लूड असे म्हटलं जातं. या प्रक्रियेत ज्वाइंट्सचा दबाव बदलतो आणि बुडबुडे जलद गतीने वाढतात व कमी होतात आणि यामुळे आवाज पैदा होते.
 
विपरीत सिद्धांत
या मॉडलमुळे दोन उलट थ्योरी अर्थात तत्त्वात एक संबंध दिसून येतो. बुडबुडे फुटल्याने आवाज पैदा होते ही गोष्ट 1971 मध्ये सामोरा आली होती. परंतू 40 वर्षांनंतर नवीन प्रयोगांनंतर याला आव्हान देण्यात आले ज्यात बोटं मोडल्याच्या काही वेळानंतरही बुडबुडे फ्लयूडमध्ये आढळतात हे सांगण्यात आले.
 
हा नवीन मॉडलनंतर हा प्रश्न सुटताना दिसत आहे कारण याप्रमाणे काही बुडबुडे फुटल्यामुळे आवाज पैदा होते. नंतरही लहान बुडबुडे द्रव पदार्थ असतात.
 
ही स्टडी सांइटिफिक रिपोर्ट्स जरनल यात प्रकाशित करण्यात आली. ज्यात कळले की बुडबुडे फुटल्यामुळे पैदा झालेल्या दबावात वेव पैदा होते. गणित समीकरणाने हे समजून मापले जाऊ शकतं. काही लोकं बोटं का मोडू पात नाही हेही कळून येतं. जर आपल्या बोटांच्या हाडांमध्ये अधिक जागा असेल तर दबाव पैदा होत नसून आवाज येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Tips : सकाळी हे 5 काम टाळा