Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नका!

रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नका!
, शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (23:21 IST)
तुमच्या मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस आहे. तुम्ही त्यासाठी त्यांना शुभेच्छा देता. मात्र, या शुभेच्या देताना थोडा विचार करा आणि रात्री १२ वाजता शुभेच्छा देण्याचे टाळा. रात्री १२ वाजता शुभेच्छा देण चांगले नाही. त्या त्यांना फलदायी ठरत नसतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या शुभेच्छा बिनकामाच्या ठरतात. मग शुभेच्छा कधी द्यायच्या असा प्रश्न पडला ना...मग हे जरूर वाचा.
 
आपल्या जीवनातील जन्मदिन हा अतिशय महत्वाचा दिवस असतो. म्हणूनच या दिवशी आपण खूप आनंदी असतो. वाढदिवस साजरा करतो. काही जण आपला वाढ दिवस गरीब कुटुंबांसोबत किंवा मुलांबरोबर साजरा करतात. तर कोणी वाढदिनी भेटवस्तू किंवा खाद्य पदार्थांचे वाटप करतात. तर अनेक जण समाजोपयोगी काम करतात. रक्तदान करतात. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी व्यक्ती भावनिकरित्या आपल्याशी जोडलेला असतो. 
 
आजकाल नातेवाईक असू द्या की जवळच्या मित्र-मैत्रिणी त्यांच्या वाढदिवशी आपण शुभेच्छा देतो. परंतु लवकर शुभेच्छा देण्याच्या नादात रात्री १२ वाजता शुभेच्छा देण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे. विशेषत: तरूणांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.

भारतीय शास्त्र आणि धर्म समजून घेतले तर ध्यानात येईल की, ही पद्धत खूपच चुकीची आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वातावरणात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते. यावेळी नकारात्मक शक्तिदेखील अधिक प्रभावी असतात. त्यामुळे रात्री १२ वाजता दिलेल्या शुभेच्छा लाभदायी नसतात.
 
हिंदू संस्कृतीनुसार दिवसाची सुरूवात सूर्योदयाने होते. सकाळची वेळ ही ऋषी मुनींच्या साधनेची असते. यावेळी वातापणात सात्विकता अधिक असते. सूर्योदयाच्यावेळी दिल्या गेलेल्या शुभेच्छा अधिक फलदायी असतात. त्यामुळे वाढदिवासाच्या शुभेच्छा या १२ वाजता न देता सकाळी देणे चांगले असते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खूप काही सांगतो आपल्या हाताचा रंग