Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

6 Special Shani Temples : दर्शन केल्याने दूर होतात शनिदोष

6 Special Shani Temples :  दर्शन केल्याने दूर होतात शनिदोष
आम्ही तुम्हाला शनीच्या 6 अशा मंदिरांबाबत सांगत आहो जेथे शनीची आराधना केल्याने ते आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करतात.  
 
1. शनी मंदिर (कोसीकलां)
दिल्लीहून 128 किमीच्या अंतरावर कोसीकलां नावाच्या जागेवर सूर्यपुत्र शनिदेवाचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात येत, याच्या जवळपास नंदगांव, बरसाना आणि श्री बांकेबिहारी मंदिर देखील आहे. असे म्हटले जाते की येथे परिक्रमा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.  
 
याच्या बाबत अशी मान्यता आहे की येथे स्वत: कृष्णाने शनिदेवाला दर्शन दिले होतो आणि वरदान दिले होते की जो मनुष्य पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने या वनाची परिक्रमा करेल त्याला शनी काही त्रास देणार नाही.  
 
कसे पोहचाल  
मथुराहून कोसीकलांचे अंतर किमान 21 कि.मी.चे आहे. मथुरापर्यंत रेल्वे मार्गाने बस किंवा निजी वाहनाद्वारे कोसीकलां पोहचू शकता.  कोसीकलांहून किमान 90 कि.मी.च्या अंतरावर खेरिया एयरपोर्ट आहे.  
webdunia
2. शनी मंदिर, उज्जैन
मध्य प्रदेशातील धार्मिक राजधानी उज्जैनला मंदिरांची नगरी देखील म्हटले जाते. सांवेर रोडवर प्राचीन शनी मंदिर देखील येथील दर्शनीय स्थळ आहे. या मंदिराची खास बाब म्हणजे येथे शनी देवासोबत इतर ग्रह देखील आहे म्हणून या मंदिराला नवग्रह मंदिर देखील म्हटले जाते. येथे लांब लांबहून शनी भक्त आणि शनी प्रकोपाहून प्रभावित लोक दर्शन करण्यासाठी येतात. या मंदिराजवळच   शिप्रा नदी वाहते, ज्याला त्रिवेणी संगम म्हटले जाते.
 
कसे जाल -
उज्जैन देशातील सर्वच मोठ्या शहरांशी रेल्वे आणि सडक मार्गाने जुळलेला आहे. येथे नियमित रूपेण गाड्या आणि बसेस चालतात. उज्जैनहून किमान 50 कि.मी.च्या अंतरावर इंदौरचा एयरपोर्ट आहे.
webdunia
3. शनी शिंगणापूर
शनीच्या खास मंदिरांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या शिंगणापूर नावाच्या गावातील शनी मंदिर. हे मंदिर महाराष्ट्राच्या अहमदनगराहून किमान 35 कि.मी.च्या अंतरावर आहे. या मंदिराची सर्वात मुख्य बाब म्हणजे येथील शनी देवाची प्रतिमा खुल्यात आहे. या मंदिराला कुठलेही छत नाही आहे. तसेच या गावात कधीही ताळा लागत नाही. अशी मान्यता आहे की येथील सर्व घरांची रक्षा स्व:त शनी देव   करतात.  
 
कसे जाल :
शनी शिंगणापूर जाण्यासाठी मुंबई, औरंगाबाद किंवा पुणे येऊन शिंगणापुरासाठी बस किंवा टॅक्सी मिळू शकते. येथून सर्वात जवळ औरंगाबाद एयरपोर्ट आहे. येथून औरंगाबादचे अंतर किमान 90 कि.मी. आहे.  
webdunia
4. शनी मंदिर, इंदूर
इंदूर, मध्यप्रदेशातील मुख्य शहरांपैकी एक आहे. येथे शनीचे खास मंदिर आहे. हे मंदिर शनीच्या बाकी मंदिरांपैकी फार वेगळे आहे   कारण येथे शनीचा 16 शृंगार केला जातो.  
 
इंदूरच्या जुनी इंदौर भागात बनलेले हे शनी मंदिर आपली प्राचीनता आणि चमत्कारी कथेमुळे प्रसिद्ध आहे. शनी देवाच्या सर्वच मंदिरांमध्ये त्यांची प्रतिमा काळ्या दगडाची बनलेली असते ज्यावर कुठले शृंगार होत नाही, पण हे एक असे मंदिर आहे जेथे शनी देवाचे रोज आकर्षक शृंगार करण्यात येतो आणि शही वस्त्र धारण करण्यात येतात. या मंदिरात शनी देव फारच सुंदर रूपात दिसतात.  
 
कसे जाल -
इंदूर, मध्य प्रदेशातील मुख्य शहरांपैकी एक आहे. येथून नियमित रेल गाड्या आणि बसेस चालतात. येथे एयरपोर्ट देखील आहे, तर हवाई मार्गाने येथे पोहचू शकता.  
webdunia
5. शनिश्चरा मंदिर, ग्वालियर
हे शनी मंदिर मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरात आहे. हे शनी मंदिर भारतातील जुन्या शनी मंदिरांपैकी एक आहे. लोक मान्यता आहे की हे शनी पिंड हनुमानाने लंकेहून फेकले होते जे येथे येऊन पडले. तेव्हापासून शनी देव येथे स्थापित आहे. येथे शनीला तेल चढवणे आणि गळे लागून भेटायची प्रथा आहे. जे कोणी येते तो मोठ्या प्रेमाने शनीला मिठी मारतो आणि आपले त्रास त्याला सांगतो. असे म्हटले जाते की असे केल्याने शनी त्या व्यक्तीचे सर्व त्रास दूर करतो.  
 
कसे जाल -
ग्वालियर, मध्य प्रदेशातील मुख्य शहरांपैकी एक आहे. येथे नियमित रेल गाड्या आणि बसेस चालतात. ग्वालियरमध्ये एयरपोर्ट पण आहे, तर हवाई मार्गाने येथे पोहचू शकता.  
webdunia
6.कष्टभंजन हनुमान मंदिर (सारंगपुर)
गुजरातमध्ये भावनगरच्या सारंगपुरमध्ये हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे, ज्याला कष्टभंजन हनुमानजीच्या नावाने ओळखले जाते. हे मंदिर खास आहे, कारण या मंदिरात हनुमानासोबत शनी देव आहे. एवढंच नव्हे तर येथे शनिदेव स्त्री रूपात हनुमानाच्या चरणी बसलेले आहे. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की जर कुठल्याही भक्ताच्या पत्रिकेत शनी दोष असेल तर त्याने कष्टभंजन हनुमानाचे दर्शन आणि   पूजा-अर्चना केले तर त्याचे सर्व दोष दूर होतात. यामुळे या मंदिरात वर्षभर भाविकांची भीड असते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाड्याचे घरासाठी काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स