rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय आपल्या माहीत आहे, गायीबद्दल 10 शुभ गोष्टी

cow importance in hinduism
अती शांत आणि सौम्य जनावर आहे गाय. हिंदू धर्मात ही पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे. तसेच ज्योतिषाच्या अनेक शास्त्रांमध्ये गायीची विशेषता दर्शवण्यात आली आहे. चला बघू गायीबद्दल दहा शुभ शकुन... जे हैराण करण्यासारखे आहे...
 
ज्योतिषीमध्ये गोधूली मुर्हूत विवाहासाठी सर्वोत्तम मानला आहे.
 
प्रवास प्रारंभ करताना गाय समोर दिसली किंवा ती आपल्या बछड्याला दूध पाजताना दिसली तर प्रवास यशस्वी पार पडेल समजावे.
 
घरात गाय असल्यास वास्तू दोष नाहीसे होतात.
 
रोज सकाळी आपल्या आहारातून एक पोळी पांढर्‍या गायीला खायला दिसल्यास शुक्राचे नीचत्व किंवा शुक्र संबंधी कुदोष स्वत: समाप्त होतात.
 
पितृदोष असल्यास गायीला दररोज किंवा अमावस्येला पोळी, गूळ आणि चारा खाऊ घातल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
 
आपल्या जन्मपत्रिकेत सूर्य अशुभ स्थितीत किंवा केतूमुळे समस्या येत असल्यास गायीची पूजा करावी, दोष नाहीसे होतील.
 
रस्त्यावर समोरहून गाय येताना दिसत असेल तर तिला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे, प्रवासात किंवा कामात यश मिळेल.
 
वाईट स्वप्न दिसत असल्यास गायीच्या नावाने स्मरण करावे. मन शांत होईल, आणि अश्या स्वप्नांपासून मुक्ती मिळेल.
 
गायीच्या तुपाचे एक नाव आयू असेही आहे- आयुर्वै घृतम्। अर्थात गायीच्या दूध-तूप याने व्यक्ती दीर्घयुष्य होतो. हस्तरेषेत आयुरेखा तुटलेली असल्यास गायीचं तूप कामात घ्यावं आणि गायीची पूजा करावी.
 
जन्मपत्रिकेत बृहस्पती अशुभ स्थिती असेल तर गायीच्या कुबडाचे दर्शन करावे. गूळ आणि चण्याची डाळ ठेवून गायीला पोळी खाऊ घालावी. तसेच जन्मपत्रिकेत सूर्य-चंद्र कमजोर असल्यास गायीच्या डोळ्यांचे दर्शन करावे, लाभ प्राप्ती होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शुक्र अशुभ फल देत असेल तर हे करा