Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्योतिष्याचे काही संकेत सांगतात की तुम्ही श्रीमंत व्हाल की नाही

ज्योतिष्याचे काही संकेत सांगतात की तुम्ही श्रीमंत व्हाल की नाही
प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत बनायची इच्छा असते ज्यामुळे त्याचेही जीवन सुखमय बनण्यास मदत मिळते. ज्योतिषीनुसार काही विशेष योग असे बनतात जेव्हा व्यक्तीची पत्रिका बघून हे जाणून घेऊ शकतो की तो व्यक्ती आपल्या जीवनकालात श्रीमंत बनेल की नाही.
 
पत्रिकेचा दुसरा भाव धन आणि समृद्धीशी निगडित आहे. जर कोणाच्या पत्रिकेत दुसरा घर किंवा भाव मजबूत असेल अर्थात घराचा मालक कारक असेल आणि केंद्रात बसलेला असेल तर अशा व्यक्तीला श्रीमंत बनण्यास कोणीही रोखू शकत नाही.  
 
जर जातकाच्या पत्रिकेत अकराव्या घरात किंवा भावाचा मालक कारक असेल आणि केंद्रात बसला असेल तर नवव्या घरात अर्थात आपल्या मित्र राशीत असेल तर त्याला व्यवसायात जास्त फायदा होण्याची शक्यता असते.  
 
ज्या जातकाच्या पत्रिकेत दुसर्‍या भावात चंद्र असेल तर तो व्यक्ती आपल्या मेहनतीमुळे धनवान बनतो.  
 
जर जातकाच्या पत्रिकेत दुसर्‍या भावात एखादा शुभ ग्रह असेल तर तो व्यक्ती श्रीमंत बनतो पण तसेच दुसर्‍या भावात एखाद्या पाप ग्रहाची नजर असेल तर तो व्यक्ती फारच कष्टाने आपले जीवन व्यक्तीत करतो. असे व्यक्ती कधीही श्रीमंत बनू शकत नाही ज्यांच्या पत्रिकेच्या दुसर्‍या घरात सूर्य आणि बुध स्थित असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठीत श्री हनुमान चालिसा (पाहा व्हिडिओ)