Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 8 April 2025
webdunia

Guruvar Upay गुरुवारी ही 10 कामे करू नका, नुकसान झेलावं लागेल

10 tasks on Thursday
गुरुवारची प्रकृती क्षिप्र आहे. गुरुवार ब्रह्मा आणि बृहस्पतीचा वार आहे. भाग्य जागृत करण्यासाठी आणि दीर्घायु होण्यासाठी यादिवशी व्रत करण्याचे विधान आहे. यादिवशी देवदर्शनाचे देखील खूप महत्त्व आहे. पण काही कामे अशी आहे जी निषिद्ध आहेत-
 
1. यादिवशी शेव्हिंग करणे टाळावे. शरीराच्या कुठल्याही भागाचे केस कापू नये नाहीतर संतान सुखात अडथळे येतात. या दिवशी नखे देखील कापू नये.
 
2. दक्षिण, पूर्व, नैऋत्य दिशेत प्रवास करणे वर्जित आहे. विशेष म्हणजे दक्षिण दिशेत दिशाशूल असतं. प्रवास करणे आवश्यक असल्यास दही किंवा जीरे खाऊन घराबाहेर पडावे.
 
3. गुरुवारी जेवण्यात वरुन मीठ वापरु नये याने आरोग्यावर प्रभाव पडतो आणि प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात. मीठ खाल्ल्याने गुरु अस्त होतो.
 
4. या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मानले गेले आहे.
 
5. या दिवशी गुरु, देवता, वडील, आजोबा आणि धर्म यांचे अपमान करु नये.
 
6. या दिवशी कपडे धुणे वर्ज्य असतं.
 
7. या दिवशी लादी पुसणे टाळावे. असे केल्याने गुरु ग्रह अशुभ फल देतं.
 
8. या दिवशी खिचडी खाणे टाळावे.
 
9. गुरुवारी स्त्रियांनी केस धुवू नये याने गुरु ग्रह कमजोर होतं आणि संपत्ती सुखात कमी येते.
 
10. गुरुवारी पूजा-पाठ संबंधित सामान, डोळ्यांशी निगडित वस्तू, टोकदार वस्तु जसे चाकू, कातरी, भांडक्ष खरेदी करु नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Surya Gochar: 13 एप्रिल रोजी मेष राशीत सूर्य गोचर, या राशींचे जातकांना सावध रहावे