Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोन्याचे दागिने घालण्याचा शौक असल्यास हे 10 नियम नक्की जाणून घ्या

सोन्याचे दागिने घालण्याचा शौक असल्यास हे 10 नियम नक्की जाणून घ्या
सोनं अर्थात गोल्ड अत्यंत पवित्र आहे आणि मौल्यवान देखील. सोन्यामुळे भाग्य उजळू शकतं आणि दुर्भाग्यदेखील येऊ शकतं. याने लाभ देखील होऊ शकतो आणि नुकसानदेखील. कोणी सोनं धारण करावं आणि कोणासाठी सोनं योग्य नाही हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे. तसेच सोनं मिळणे आणि सोनं हरवणे देखील अशुभ आहे.
 
केवळ शौक म्हणून सोनं घालू नये. गरज आणि लाभ लक्षात घेता सोनं धारण केलं पाहिजे. सोनं घातल्याने फायदा होतो आणि सोन्यामुळे आपण श्रीमंत आणि समृद्ध होऊ शकता परंतू सोनं नुकसान करणारा असलं तर जीवनात अपघात वाढू शकतात.
 
आम्ही आपल्याला सांगणार आहोत की सोनं कुठे धारण करू नये आणि कुठे ठेवू नये. सोन्याचे काही नियम जाणून घ्या:
 
पहिला नियम
सोनं धारण करण्याचे लाभ : सन्मान तसंच राजपक्षाहून सहयोग अपेक्षित असल्यास सोनं घालावं. एकाग्रता वाढवण्यासाठी तर्जनी बोटात सोनं घालावं. दांपत्य जीवन आनंदी व्हावं म्हणून गळ्यात सोन्याची चेन घालावी. संतान प्राप्तीसाठी अनामिका बोटात सोनं धारण करावं.
 
दुसरा नियम
सोन्याने ऊर्जा आणि उष्णता दोन्ही प्राप्त होते आणि याने विषाचा प्रभावदेखील दूर होतो. सर्दी किंवा श्वासासंबंधी आजार असल्यास करंगळीत सोनं धारण करावं. परंतू कुंडलीप्रमाणे ग्रहांचे स्थान बघून ज्योतिष सल्ल्याने सोनं धारण करणे अधिक योग्य ठरेल. 
 
तिसरा नियम
सोनं धारण करण्याचे नुकसान : ज्या लोकांना पोट किंवा लठ्ठपणा या प्रकाराची समस्या असेल त्यांनी सोनं धारण करू नये. रागीट, वाचाल आणि चिडचिड करणार्‍यांनी देखील सोनं धारण करणे टाळावे.
 
चौथा नियम
गुरु खराब असल्यास सोनं धारण करू नये : सोन्याचा मूळ रंग पिवळा आहे आणि पिवळा रंग बृहस्पतीचा प्रतिनिधी असल्याचे मानले गेले आहे. कुंडलीत बृहस्पती खराब असल्यास किंवा कोणत्याही दूषित असल्यास अश्या लोकांदेखील सोनं घालू नये. 
 
लग्नानुसार सोनं धारण करावं : आपले लग्न मेष, कर्क, सिंह आणि धनू असल्यास आपल्यासाठी सोनं धारण करणे उत्तम ठरेल. वृश्चिक आणि मीन लग्न असलेल्या लोकांसाठी मध्यम आणि वृषभ, मिथुन, कन्या व कुंभ लग्न असणार्‍यांसाठी उत्तम नसतं. तूळ आणि मकर लग्न असलेल्या लोकांनी सोनं धारण करणे टाळावे.
 
पाचवा नियम
शनीचा व्यवसाय करत असल्यास : लोखंडी, कोसळा किंवा शनी संबंधी धातूचा व्यवसाय करत असल्यास सोनं धारण करू नये. असे केल्यास व्यवसायात नुकसान झेलावं लागू शकतं.
 
सहावा नियम
गर्भवती आणि वृद्ध महिलांनी सोनं घालणे टाळावे : वृद्ध आणि गर्भवती महिलांनी सोनं धारण करू नये. अती आवड असल्यास कमी प्रमाणात सोनं घालू शकतात परंतू अधिक दागिने घातल्याने समस्या येऊ शकतात.
 
सातवा नियम
उजव्या हातात घालावं सोनं : सोनं डाव्या हातात घालणे टाळावे. विशेष गरज असल्यास डाव्या हातात धारण करावे. कारण डाव्या हातात सोनं धारण केल्याने समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्याच प्रकारे सोन्याचे दागिने केवळ त्या व्यक्तीला भेट म्हणून द्यावे ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम असेल. अनोळखी किंवा अप्रिय व्यक्तीला सोन्याची भेट देऊ नये. 
 
आठवा नियम
पायात घालू नये सोनं : पायात सोन्याचे जोडवे किंवा पैंजण घालू नये. याने दांपत्य जीवन समस्या आढळू शकते.
 
कंबरेत सोनं घालणे टाळा : कंबरेत सोनं घालणे टाळावे कारण याने पचन तंत्र खराब होऊ शकतं. पोटासंबंधी समस्या उत्पन्न होऊ शकतात. गर्भाशय, यूट्रस संबंधी समस्यादेखील उद्भवू शकतात.
 
नववा नियम
दारू आणि मांसाहार निषेध : आपण सोनं धारण केलं असल्यास दारू आणि मांसाहाराचे सेवन टाळावे. असे केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतो. सोनं पवित्र धातू असल्यामुळे पवित्रतेचे पालन करणे गरजेचे आहे.
 
सोनं डोक्याजवळ ठेवू नये : झोपताना सोनं डोक्याजवळ ठेवून झोपू नये. अनेकदा लोकं चेन, अंगठी काढून उशाशी ठेवतात. अशाने अनिद्रा व इतर समस्या आढळू शकतात.
 
दहावा नियम
घरात सोनं ईशान कोपर्‍यात ठेवावे : अनेक लोकं सोनं तिजोरीत किंवा कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवतात. सोनं नेहमी लाल कपड्यात गुंडाळून ठेवावे. याने सोन्यात वाढ होते. सोनं घरातील ईशान किंवा नैरृत्य कोपर्‍यात ठेवणे योग्य ठरेल. तसेच सोन्याच्या दागिन्यासोबत खोटे दागिने ठेवू नये. त्यासोबत शिक्केदेखील ठेवू नये. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन वर्षासाठी फायदेशीर ठरतील हे 10 वास्तू टिप्स, जरूर वापर करून बघा