Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Guru Purnima गुरु पौर्णिमेला राशीनुसार या गोष्टी करा दान, सुख-समृद्धी राहील

guru purnima
, सोमवार, 11 जुलै 2022 (16:30 IST)
मेष- ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र सणावर गरजूंना गूळ आणि लाल रंगाचे कपडे दान करावे. असे केल्याने आर्थिक संकट संपेल.
 
वृषभ- वृषभ राशीच्या लोकांना गुरु पौर्णिमेच्या दिवशी साखरेचे दान करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या देवघरात अखंड तुपाचा दिवा लावावा.
 
मिथुन- गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीला हिरवा चारा द्यावा. यासोबतच तुम्ही हिरवा मूगही दान करू शकता. असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहतं.
 
कर्क- कर्क राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना तांदूळ दान करावे. यामुळे तणावापासून आराम मिळतो.
 
सिंह- सिंह राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गव्हाचे दान करावे. त्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते.
 
कन्या- ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला अन्नदान करावे आणि त्यांच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी.
 
तूळ- तूळ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलींना खीर खाऊ घालावी. असे केल्याने यश आणि समृद्धी प्राप्त होते.
 
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माकडांना हरभरा आणि गूळ खाऊ घालावा. तसेच गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके आणि वाचन लेखनाच्या वस्तू दान करव्या.

धनु- धनु राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात हरभरा दान करावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
 
मकर- मकर राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करावे. असे मानले जाते की असे केल्याने त्या व्यक्तीचे काम किंवाव्यवसायात येणारे अडथळे दूर होतात.
 
कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी वृद्धाश्रमातील वृद्धांना वस्त्र, अन्न दान करावे. मंदिरात काळ्या उडदाचे दान देखील करू शकता.
 
मीन- मीन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना हळद आणि बेसनाची मिठाई दान करावी. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Husband Wife Fighting जर पती-पत्नीमध्ये जास्त भांडणे होत असतील तर हे ज्योतिषीय उपाय प्रभावी ठरतील