Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

स्वप्न आणि त्यांचे फळ, वाईट स्वप्न येत असल्यास हे उपाय करावे

Nightmares
, सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:42 IST)
स्वप्न शास्त्राच्या माध्यमाने स्वप्नांचा अभ्यास आणि त्यांचा फळांचा विचार केला जातो. आपण झोपताना बरीच स्वप्ने बघतो. त्यामध्ये काही स्वप्न शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ घटनांचा संकेत देतात. बऱ्याच वेळा झोपताना आपल्याला वाईट स्वप्ने येतात की आपली झोपच मोड होते. 
 
अग्निपुराणानुसार, जर एखाद्याला वाईट स्वप्नामुळे जाग येत असल्यास तर त्यांनी पुन्हा झोपी जावे. असे केल्याने ते वाईट स्वप्न त्याच्या मेंदूमधून निघून जातं. सकाळी उठल्यावर मध्यरात्रीचे स्वप्ने लक्षात राहत नाही आणि शांत मनाने माणूस आपल्या कामाला लागू शकतो आणि एका नव्या दिवसाची सुरुवात करू शकतो.
 
स्वप्नशास्त्रानुसार, असे म्हटले जाते की, माणसाला चांगले किंवा वाईट स्वप्न त्याचा कर्मानुसार येतात. पण ब्राह्मणांची सेवा केल्याने माणसाला आपल्या वाईट कर्मापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या वाईट स्वप्नांचा देखील नाश होतो. योग्य ब्राह्मणांची पूजा केल्याने आणि त्याला दान दिल्याने वाईट स्वप्नांपासून वाचता येऊ शकतं.
 
शास्त्रानुसार, घरात वास्तू दोष असल्यास देखील वाईट स्वप्न दोष होऊ शकतो आणि रात्री वाईट स्वप्न येतात. वास्तविक, आपल्या घराच्या भोवती असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे अशुभ आणि वाईट स्वप्न येतात. म्हणून घराच्या सुख आणि शांततेसाठी नकारात्मक ऊर्जेला घरापासून दूर ठेवणे जरुरी असतं. घराच्या वास्तूला ठीक करावे आणि घरात हवन करवावे.
 
शास्त्रानुसार वाईट स्वप्नांना त्याच वेळी विसरावं. याचा उल्ल्लेख कोणाकडे देखील करू नये. असे केल्याने माणूस पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करतो आणि स्वप्नातली घटना त्याचा मेंदूतून निघत नाही आणि मनुष्य पुन्हा-पुन्हा त्याच स्वप्नाला आठवून तणाव घेतो.
 
शास्त्रानुसार, नियमितपणाने सूर्यदेवाची उपासना केल्यास वाईट स्वप्न पडत नाही. सूर्यदेवाला दररोज पाण्याने अर्घ्य द्यावे. असे म्हणतात की सूर्याला पाणी अर्पण केल्याने पाण्याच्या थेंबा माणसाच्या शरीरास स्पर्श करतात, ते माणसाच्या शरीर आणि मनाला शुद्ध करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 1 ते 7 नोव्हेंबर 2020