तळपायांवरून भविष्य

तळहाताच्या रेषा पाहून भविष्य सांगण्याची पद्धत बहुतेकांना माहीत असते, पण तळपायावर असणार्‍या रेषादेखील भविष्य वर्तवतात, हे जाणून आपल्याला थोडं आश्चर्यच वाटेल. पण हा ही एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. माणसांच्या तळहाताप्रमाणेच त्यांच्या तळपायाची ठेवण, त्याचा आकार, त्यावरील रेषा व चिन्हे यांच्यावरूनही त्यांचे भाग्य व स्वभाव ठरविणे शक्य आहे. पाहू तळपायांवरील रेषांचे भाकीत..


 
* पायावरील रेषा खंडित असणे किंवा तुटणे हे अनिष्ट लक्षण असून अशा प्रकारच्या रेषा असणारा माणूस वारंवार गोत्यात येतो. या लोकांचा स्वभाव चंचल असतो म्हणून यांची वृत्ती धरसोडीची असते.
 
रेषांची जाळी असणे हे लक्षण अत्यंत अशुभ असतं.

* नागमोडी रेषा असणार्‍याच्या आयुष्यात अनेक फेरबदल व उलथापालथी होतात.


 
रेषेवर चौकोन चिन्ह असल्यास त्याची फळे पदरी पडण्यास अनेक विघ्ने येतात.

* रेषेवर त्रिकोण चिन्ह असल्यास शुभफल तीव्र आणि प्रखर मिळतात. याने कीर्ती व ऐश्वर्यही प्राप्त होतं.


 
अंगठ्याच्या टेकडीखालून पायाच्या आडव्या बाजूकडून उगम पावणारी रेषा प्रवासी रेषा असते. या रेषेची लांबी एक ते दीड इंच असल्यास त्या व्यक्तीला बराच महत्त्वाचा प्रवास करावा लागतो.  ही रेषा असणार्‍या माणसाचे उत्तरायुष्य स्थिर स्वरूपाचे व भरभराटीचे जाते.

* पायाच्या खोटेवर चंद्राकृती असणारी रेषा फारच क्वचित आढळते. ही रेषा एक ते दीड इंच लांबीची असते. या रेषेमुळे माणूस जगात अद्वितीय व लोकोत्तर ठरतो. मात्र चंचल वृत्ती, व्यभिचारी, कामवासना व दुर्गुणांमुळे या माणसाच्या प्रगतीत बर्‍याच अडचणी निर्माण होतात. 
पायाच्या आडव्या बाजूकडून निर्माण होऊन रेषा तळपायाच्या खोलगट भागामध्ये तळपायाच्या मधोमध करंगळीच्या दिशेने जाते. दोन इंचापर्यंत लांबी असलेली ही रेषा असणारे व्यक्ती अतिशय चळवळे असून ध्येयनिष्ठ असतात. आपल्या चिरस्मरणीय कामगिरीमुळे मृत्यूनंतरही त्यांचे स्मरण चिरकालापर्यंत केले जाते.

* तळव्याच्या मध्याच्या आडव्या बाजूने निर्माण होऊन दोन इंचापर्यंत अंगठ्याच्या दिशेने जाणारी रेषा पुरुषोत्तम रेषा म्हणून ओळखली जाते. ही रेषा असणार्‍या व्यक्तीची आर्थिक स्थिती प्रारंभी बेताची असली तरी ती व्यक्ती स्वकर्तृत्वाने आपले नशीब काढते व धनाढ्य बनते. ही व्यक्ती शांत, उदार, धार्मिक, सद्गुणी असते.


 
अंगठ्याच्या कोपर्‍यातून उगम पावून अंगठ्याच्या उंचवट्यावरून थोडी पुढे जाणारी रेषा म्हणजे माया रेषा. ही रेषा कोणत्याही मार्गाने मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दैनिक राशीफल 20.10.2018