Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्र ग्रहण 2020: आपल्यावर पडेल हा प्रभाव

webdunia
बुधवार, 8 जानेवारी 2020 (12:34 IST)
मेष: मिश्रित प्रभाव पडेल. या ग्रहणामुळे मेष राशीच्या जातकांमध्ये पराक्रम वाढेल. कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीला कष्ट होण्याची शक्यता आहे.
 
वृषभ: हानीचे संकेत आहे. आपल्या वाणीवर ताबा ठेवा नाहीतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
मिथुन: या राशीवर सर्वाधिक प्रभाव बघायला मिळेल. मानसिक कष्ट किंवा कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
कर्क: अत्यंत प्रभावशाली ठरेल. खर्च वाढेल. कोणत्याही कारणामुळे प्रवास होण्याची शक्यता आहे.
 
सिंह: ग्रहण या राशीच्या जातकांना अनपेक्षित लाभ देईल. सोबतच आय वृद्धी होई. धन प्राप्तीचे योग आहे.
 
कन्या: मिश्रित फल प्राप्ती होईल. या राशीच्या जातकांनी आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे.
 
तूळ: ग्रहण चांगले परिणाम देणार नाही. कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता देखील आहे.
 
वृश्चिक: ग्रहणामुळे अपघात किंवा धन हानीचे योग निर्मित होत आहे. अशात या राशीच्या जातकांनी विशेष काळजी घ्यावी.
 
धनू: ग्रहणाचा प्रभाव या राशीच्या जातकांच्या नात्यांवर पडताना दिसत आहे. कुटुंबात किंवा बिझनेस पार्टनरशी वाद होऊ शकतात.
 
मकर: या राशीसाठी चांगले योग बनत आहे. शत्रूंपासून मुक्ती मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषकरून पाण्यामुळे होणार्‍या आजारांपासून सावध राहा.
 
कुंभ: चंद्र ग्रहण शुभ फलदायक आहे. प्रेम संबंधांसाठी योग्य वेळ आहे. तरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं, काळजी घ्या.
 
मीन: मिश्रित परिणाम देणारे असून एकीकडे आरोग्य बिघडू शकतं तर दुसर्‍या बाजूला व्यवसायात यश मिळण्याचे योग आहे. या दरम्यान प्रॉपर्टी विकताना सावध राहा.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

वास्तुशास्त्रीतील नक्षत्रयोग