Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वक्रीय शनी : 11 मे पासून शनी बदलणार मार्ग, काय घडणार जाणून घ्या

वक्रीय शनी : 11 मे पासून शनी बदलणार मार्ग, काय घडणार जाणून घ्या
, शनिवार, 18 एप्रिल 2020 (07:56 IST)
शनी 11 मे पासून वक्रीय होणार आपला मार्ग बदलणार आहे. शनीची ही पूर्वगामी गती 142 दिवस चालणार आहे. या नंतर शनी 2 सप्टेंबर पासून पूर्वगामी होणार आहे. अश्या परिस्थितीत काही लोकांना त्रास होतो. काहींचे त्रास वाढतात. ज्योतिष शास्त्रानुसार सुमारे अडीच वर्षे शनी एकाच राशीमध्ये राहतात. आतातर शनी वक्रीय झाला आहे त्यामुळे राशींवर काय प्रभाव पडणार आहे बघू या..
 
कधी होणार शनी वक्रीय ?
11 मे 2020 रोजी शनी मार्ग बदलणार आहे आणि आपली युती करणार आहे. शनीचीही पूर्वगामी गती 142 दिवस अशीच राहणार आहे. शनी 29 सप्टेंबरला पुन्हा मार्गी होणार. ज्योतिष शास्त्रानुसार शनी वक्रीय झाल्यानंतर काही राशीसाठी कष्टकारी असतात. राशी चक्रात बरेच संकटे आपल्या सामोरी येतात. 
 
कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे जाणून घेऊ या....
ज्योतिष शास्त्रात शनी हा न्यायाचा कारक मानला जातो. शनीचे मार्ग बदलण्याने त्या राशींवर जास्त परिणाम पडणार आहे ज्या राशींवर शनीची साडेसाती किंवा शनी अडीच वर्ष त्या राशी मध्ये आहे. जर आपल्या कुंडलीत शनी शुभ स्थळी असेल तर आपल्या राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ स्थळी असल्यास अशुभ फळे मिळतील. 
 
सध्याच्या काळात धनू, मकर आणि कुंभ या तीन राशी चक्रावर शनीची साडेसाती सुरू आहे. तसेच मिथुन आणि तूळ राशींवर शनीचे अडीच वर्ष सुरू आहे. त्यामुळे शनी मार्गी होण्याचा शुभ अशुभ प्रभाव या 5 राशींवर सर्वात जास्त पडणार आहे.
 
शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठीचे काही उपाय-
* दर शनिवारी उपवास करावा.
* दररोज संध्याकाळी पिंपळाला पाणी घालावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
* शनी बीजमंत्र ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः चे 108 वेळा जपा.
* काळे किंवा निळे कापड्याचा वापर करावा.
* घोर गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाऊनमध्ये गृहकलह टाळण्यासाठी या 5 वास्तू टीप्सचे अनुसरण करा