Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्योतिष: या लोकांवर नाही पडत शनीच्या साडेसातीचा प्रभाव, मिळतो शुभ परिणाम

webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (14:28 IST)
लोकांच्या तोंडावर शनीची साडेसातीचे नाव येत्याच मनात एक भिती निर्माण होऊ लागते. असे मानले जाते की जर एखाद्या जातकावर शनीची वाईट दृष्टी पडते तर त्या व्यक्तीचे सर्व काम बिघडू लागतात त्यांच्या जीवनात बर्‍याच प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ लागतात. शनी जेव्हा केव्हा एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या जन्मराशीहून पुढची आणि मागची राशीत शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम मिळू लागतात.
 
शनीचा गोचर नेहमीच प्रत्येकासाठी अशुभ नसतो. पत्रिकेच्या दशेनुसार काही लोकांसाठी शनीची साडेसाती फारच शुभ असते. ज्या जातकांना शनीची साडेसाती शुभ फळ देते त्यांना अपार धन दौलत, समृद्धी आणि मान सन्मान मिळतो. तर जाणून घ्या शनीची साडेसाती कुणाला शुभ परिणाम देते.
 
जेव्हा जातकाच्या पत्रिकेत एखाद्या शुभ ग्रहाची दशा किंवा महादशा सुरू असते आणि त्या दरम्यान शनीची साडेसाती देखील असेल तर अशा दशेत शनी अशा लोकांवर आपली वाईट दृष्टी कमीच टाकतो. अशा लोकांना यश जरूर मिळत पण त्यांसाठी त्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागते 
 
मकर आणि कुंभ राशीचे स्वामी शनी आहे आणि तूळ राशीत शनी उच्चाचा असतो अशात शनीची साडेसाती असली तरी देखील या तीन राशींवर शनीचा वाईट प्रभाव फारच कमी दिसून येतो. 
 
शनी जर एखाद्या जातकाच्या पत्रिकेत तिसरा, सहावा, आठवा आणि बाराव्या घरात उच्चाचा असेल तर अशा व्यक्तीवर शनीची साडेसाती असली तर त्यांना शुभ परिणाम मिळतात. 
 
जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्र मजबूत भावात असेल तर शनीची साडेसातीच्या दरम्यान देखील जातकावर त्याचा वाईट प्रभाव पडत नाही. अशा व्यक्तींना फायदा होण्याची शक्यता जास्त असते. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

वास्तुप्रमाणे झोपण्यापूर्वी काय करावे आणि काय नाही