कधी या गोष्टीवर लक्ष दिले की आपल्याला कुटुंबावर किंवा आपल्यावर एखादं संकट येणार असेल तर त्याचा सर्वात आधी प्रभाव आपल्या घरातील तुळशीच्या झाडावर होतो. अशात आपण तुळस कितीही जपली तरी हळू-हळू ती वाळायला लागतं. तुळशीचे झाड आपल्यावर येणार्या संकटाची कल्पना देतं.
शास्त्रांप्रमाणे ज्या घरात संकट येणार असतं त्या घरातून लक्ष्मी अर्थातच तुळस निघून जाते, कारण जिथेही दारीद्र, अशांती किंवा क्लेश असेल तिथे लक्ष्मी वास करत नसते. ज्योतिष्याप्रमाणे असे बुध ग्रहामुळे होतं. बुध याचा प्रभाव हिरव्या रंगावर होत असून याला वनस्पतीसाठी कारक ग्रह मानले आहे.
बुध ग्रह इतर ग्रहांचे चांगले आणि वाईट प्रभाव जातकांपर्यंत पोहचवयाचे काम करतो. त्यामुळे अशुभ फल मिळणार असेल तर झाड वाळायला लागतं तसेच शुभ फल मिळणार असेल तर झाडाची वाढ होते.
घरात तुळस एका वैद्यासारखे आहे. ही वास्तू दोष दूर करते. तुळस आरोग्यासाठी खूप गुणकारी असून ही घरातील दोष दूर करून जीवन निरोगी आणि सुखी करण्यात सक्षम आहे.