हे 3 अंक अशुभ मानले गेले आहेत, यात आपला मूलांक तर सामील नाही?

बुधवार, 8 एप्रिल 2020 (11:03 IST)
अंक ज्योतिष एक पूर्ण आणि चमत्कारिक शास्त्र आहे ज्याने अंकांचे अध्ययन करून भविष्याबद्दल सांगितलं जातं. अंक ज्योतिष्याचे नऊ अंक नऊ ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. काही अंक धोकादायक आणि अशुभ देखील मानले गेले आहे. 
 
अंक 3
तसं तर 3 अंक गुरुचा असतो. या अंकाचा प्रभाव जातकाला मेधावी आणि हुशार बनवतो. परंतू हा अंक नेहमी शुभ फल प्रदान करणारा नाही. या अंकाने अनेक अपघात इतिहासात नोंदलेले आहेत. या अंकाचे जातक क्षमता असून देखील करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरा जातात. 3 अंक अनेकदा कौटुंबिक समस्यांना सामोरा जातात. 
 
अंक 4
राहूचा अंक सगळ्या अंकांपेक्षा अधिक अनाकलनीय आहे. 13 नंबर अशुभ असल्याचे कारण म्हणजे याचा जोड 4 असणे आहे. 4 अंक सर्वाधिक वेदना प्रदान करणारा अंक आहे. या अंकामध्ये पैदा होणारे जातक अनेक क्षमतेचे धनी असून देखील रहस्यमयी असतात. यांच्या जीवनात अनेक चढ-उतार बघायला मिळतात. यश मिळण्यात खूप अडथळे निर्माण होतात. 
 
अंक 8
या अंकात सर्वात मोठे दहशतवादी हल्ले, युद्ध, भूकंप, पूर बघण्यात आले आहे. तसं तर हा अंक व्यापार्‍यांना यश प्रदान करणारा आहे परंतू यांचा जीवनात खूप संकट येत असतात. आरोग्याच्या दृष्टीने हा अंक कष्ट प्रदान करणारा आहे. या अंकच्या जातकांना जीवनात खूप धोके मिळतात. कोणत्याही देशाच्या दृष्टिकोनात बघितल्यास हा अंक अपघातांचा साक्षी राहिलेला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख वास्तुदोष दूर करेल गंगाजल...