Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जापासून सुटका मिळवायचा आहे, मग करा काही सोपे उपाय

कर्जापासून सुटका मिळवायचा आहे, मग करा काही सोपे उपाय
, सोमवार, 10 डिसेंबर 2018 (09:02 IST)
कर्ज घ्यायला कुणालाच आवडत नाही पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत नसते की तो एकाच वेळेस रुपये खर्च करू शकेल म्हणून आमच्या येथे बर्‍याच काळापासून कर्ज घेण्याची प्रथा सुरू आहे. आजकाल बँकांच्या माध्यमाने हे काम पूर्ण केले जाते. पण बँकांही वसुली करतात अर्थात कर्जतर फेडावेच लागते. 
 
कितेक वेळा कर्ज घेतल्यानंतर त्याला परत फेडणे फारच अवघड जाते आणि त्याचे संपूर्ण जीवन कर्ज फेडता-फेडता निघून जाते. तुमच्यासाठी खास सादर करत आहो शास्त्र आणि जुन्या मान्यतांनुसार कर्ज घेणे व देण्यासंबंधी काही सोपे उपाय. या गोष्टींना अमलात आणण्यावर तुमचे कर्ज किंवा ऋण असतील तर ते डोक्यावरून उतरून जातील.
 
1. कुठल्याही महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथी 1, शुक्ल पक्षाच्या 2, 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 12, 13 पौर्णिमा व मंगळवारच्या दिवशी उधार द्या आणि बुधवारी कर्ज घ्या.
 
2. चर लग्न जसे- मेष, कर्क, तूळ व मकरमध्ये कर्ज घेतल्याने लवकरात लवकर ते फेडले जाते. पण, चर लग्नात कर्ज देणे टाळावे. चर लग्नात पाच व नवव्या स्थानात शुभ ग्रह व आठव्या स्थानात कुठलेही ग्रह नसायला पाहिजे, अन्यथा ऋण वर ऋण चढत जातो.
 
3. रोज लाल मसुरीच्या डाळीचे दान करावे. 
 
4. कर्ज घ्यायला जाताना घरातून निघताना जो स्वर असेल, त्या वेळेस तोच पाय बाहेर काढल्याने कार्यसिध्दी नक्कीच होते पण कर्ज देताना सूर्य स्वराला शुभकारी मानण्यात आले आहे.
 
5. वास्तुदोष नाशक हिरव्या रंगाचे गणपती मुख्य द्वाराच्या पुढे-मागे लावावे. 
 
6. वस्तूनुसार ईशान्य कोपर्‍याला स्वच्छ ठेवायला पाहिजे.
 
7. दर मंगळवार व शनिवारी मारुतीला तेल-सिंदूर चढवायला पाहिजे आणि कपाळावर सिंदुराचा तिलक लावावा. हनुमानचाळिसा किंवा बजरंगबाणाचा पाठ करावा.
 
8. शुक्ल पक्षाच्या प्रत्येक बुधवारी ऋणहर्ता गणेश स्तोत्राचा पाठ करावा.
 
9. बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप-साखर मिसळून गायीला चारल्याने लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते.
 
10. सरसोचे तेल मातीच्या दिव्यात भरून, नंतर त्या दिव्याचे झाकण लावून त्याला कुठल्याही नदी किंवा तलावाच्या तळाजवळ शनिवारी सूर्यास्ताच्या वेळेस जमिनीत पुरून देण्याने तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता. 
 
11. शनिवारच्या दिवशी घराच्या चोखतीत अभिमंत्रित काळ्या घोड्याची नाळ लावावी.
 
12. स्मशानातील विहिरीचे पाणी एखाद्या पिंपळाच्या वृक्षाला वाहायला चढवायला पाहिजे. हे कार्य 7 शनिवार न चुकता केले पाहिजे. 
 
13. 5 गुलाबाचे फूल, 1 चांदीचे पान, थोडे तांदूळ, गूळ एका पांढर्‍या वस्त्रात ठेवून, 21वेळा गायत्री मंत्राचा जप करून ते पाण्यात वाहून द्या. हे कार्य नेमाने 7 सोमवार करायला पाहिजे. 
 
14. सिद्ध-कुंजिका-स्तोत्राचे नित्य एकादश पाठ करायला पाहिजे. 
 
15. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगल स्तोत्राचा पाठ करावा व घेतलेल्या कर्जाची पहिला हफ्ता मंगळवारापासून देणे सुरू करावे. असे केल्याने कर्ज लवकर फेडल्या जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 10 ते 16 डिसेंबर 2018