पूर्वा भाद्रपदा, आश्लेषा, पूर्वा फाल्गुनी, मघा, भरणी आणि आद्र्रा या नक्षत्रांवर नवीन कपडे वापरायला सुरुवात करू नये.
रविवारी - नवीन कपडे वापरायला सुरुवात केली तर हानी, अल्पधन अशी फळं मिळतात.
सोमवारी - व्रण, फोड, घाव
मंगळवारी - क्लेश, रोग, पीडा तर
बुधवारी - नवे कपडे वापरायला सुरुवात केली तर बंधू मीलन, आणखी नवीन कपड्यांचा लाभ,
गुरुवारी - विद्या व संपत्तीचा लाभ, शत्रुहानी
शुक्रवारी - नाना प्रकारचे लाभ, स्त्रीसुख आदींची प्राप्ती होते, असं ग्रंथांनी म्हटलंय.
शनिवारी - गरीबी, असाध्य रोग, भय अशी फळं मिळतात. मात्र या नियमाला विवाहाचा दिवस आणि दिवाळीसारख्या सणाचा अपवाद आहे.