Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कलर थॅरेपी अर्थातच दिवसानुसार रंगांची निवड करणे!

कलर थॅरेपी अर्थातच दिवसानुसार रंगांची निवड करणे!
, बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:49 IST)
रंगांचा आपला विशेष महत्त्व असून त्याचे वेगळेच व्यक्तित्व असतात. ते आनंद दर्शवतात, मनातील भावनांनासुद्धा दर्शवतात. बरेचसे असे रोग असतात जे रंगांच्या माध्यमाने बरे होतात, ज्याला आम्ही कलर थॅरेपी म्हणतो. तर मग रंग आमचे भाग्य बदलण्यात मदत करतात का? त्यासाठी आम्ही दिवसानुसार रंगाची निवड करू शकतो.
 
सोमवार- सोमवार म्हणजे चंद्राचा दिवस. म्हणून या दिवसाचा रंग आहे पांढरा. 
 
मंगळवार - हा दिवस मारुतीचा आहे. त्यांच्या मुरत्या केशरी (भगवा) रंगाच्या असतात. म्हणून या दिवशी भगवा रंगाचा विशेष महत्त्व असतो, याला इंग्रेजीत ऑरेंज कलर 
 
म्हणतात. 
 
बुधवार- तिसरा दिवस देवांचा देव गणपतीचा असतो, ज्याला सर्वात जास्त दूर्वा प्रिय असते. म्हणून या दिवशी हिरव्या रंगाचा महत्त्व असतो. 
 
गुरुवार- म्हणजे आठवड्याचा चवथा दिवस, जो वृहस्पती देव आणि साई बाबाचा आहे. वृहस्पती देव स्वयं पिवळ्या रंगाचे असतात, म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचा महत्त्व 
 
असतो. 
 
शुक्रवार- हा दिवस देवीचा असतो, जी सर्वव्यापी जगतजननी आहे. त्यासाठी हा दिवस सर्व रंगांचा मिक्स किंवा प्रिंटेड कपड्यांचा असतो. 
 
शनिवार- शनी देवतेला समर्पित या दिवशी डार्क निळा किंवा काळा रंगाचा महत्त्व आहे. 
 
रविवार- ह्या दिवशी सूर्याची उपासना केली जाते म्हणून गुलाबी किंवा लाल रंगाचा महत्त्व असतो. 
 
काही रंगांशी आमचा तालमेल असतो म्हणून ते रंग आम्हाला 'पॉझिटिव्ह एनर्जी' देतात. म्हणूनच काही खास रंग आम्हाला जास्त आकर्षित करतात. यालाच 'कलर सायंस ' 
 
किंवा रंग विज्ञान म्हणतात. पण ज्योतिषावर विश्वास ठेवणारे लोक दिवसाप्रमाणे रंगांची निवड करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरात वास्तू दोष असल्यास तर दररोज सुख व समृद्धी देणार्‍या भगवान श्री गणेशाची पूजा करावी