Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
, बुधवार, 3 मार्च 2021 (18:07 IST)
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही सांगत आहोत काही टिप्स हे लक्षात ठेवल्यानं परीक्षेत एकही गुण कमी होणार नाही.  
 
* विश्रांती घ्या- 
  सतत वाचल्याने काही लक्षात राहत नाही. म्हणून मधून विश्रांती घेणं महत्त्वाचे आहे. प्रत्येक तासाने 10 मिनिटाची विश्रांती घ्या.  
 
* कठीण विषयापासून सुरुवात करा- 
अभ्यास सुरु करण्यापूर्वी कठीण विषयापासून सुरु करा. मेंदू ताजे असल्यास आपण जे देखील काही वाचता ते लक्षात राहत.  
 
* अभ्यासक्रम लक्षात ठेवा- 
एकच धडा वाचू नका. परीक्षेला जेवढे दिवस बाकी आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक तयार करा.
 
* योग्य आहार घ्या- 
परीक्षेच्या पूर्वी बाहेरचे काहीच खाणे-पिणे टाळा. घरात शिजवलेले ताजे आणि सुपाच्य जेवण करा, फळ खा, असा आहार घ्या ज्यामुळे ऊर्जा मिळेल.   भरपूर पाणी प्या.
 
* नोट्स बनवा- 
सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचे नोट्स बनवा. शेवटच्या वेळेस पुनरावृत्ती करण्यासाठी हे उपयुक्त आहेत.
 
*  तणाव घेऊ नका- 
असू शकत की घरातील सदस्य किंवा शिक्षक आपल्यावर सतत अभ्यासासाठी दबाव आणतील किंवा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी दबाव आणतील. आपण आपले लक्ष केंद्रित करा आणि परिणामाची काळजी करू नका.  
 
* मॉडेल पेपर सोडवा-
मॉडेल प्रश्नपत्र सोडवणे आपल्या साठी मदत करू शकते. या मुळे निर्धारित वेळी प्रश्न सोडविण्यात मदत होईल.
 
* सर्व समस्या सोडवा- 
एखाद्या विषयामध्ये जो धडा समजत नाही त्याच्या वर आधारित समस्या सोडवून घ्या. नंतर करू असं ठेऊ नका.
 
* आत्मविश्वास ठेवा- 
आपण जे काही वाचले आहेत, त्यावर आत्मविश्वास ठेवा. आपल्याला सर्व काही येत आहे हा विचार करून पेपर सोडवायला जावे.
 
* चेकलिस्ट किंवा यादी तयार करा-
पेपरच्या दिवशी आपल्याला काय घेऊन जायचे आहे या साठी चेकलिस्ट तयार करा. ती एका ठिकाणी ठेवा आणि नंतर तयारी सुरु करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जागतिक महिला दिन विशेष 2021 : "महिलांचा सन्मान "