Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभ्यासामध्ये तीक्ष्ण कसं बनाव

अभ्यासामध्ये तीक्ष्ण कसं बनाव
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (20:15 IST)
बऱ्याच विध्यार्थीची समस्या असते की ते अभ्यास करतात  परंतु परीक्षेच्या वेळी सर्व विसरून जातात. ह्याच कारण तणाव आहे आणि तणाव या साठी होत की आपण व्यवस्थित अभ्यास करत नाही. जर आपण व्यवस्थितरीत्या अभ्यास कराल तर आपल्यासह ही समस्या होणार नाही. आपण जो काही अभ्यास केला आहे त्याचे सखोल चिंतन करा आणि त्याच्या वर विचार करा की आपण काय-काय वाचले आहे? रात्री झोपण्यापूर्वी त्याचा विचार करा. असं केल्यानं मेंदूमध्ये पुनरावृत्ती होते. आपण जे काही वाचत आहात त्याला लिहून ठेवा. असं केल्यानं ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील.  
 
* अभ्यासाची पद्धत सुधारा आणि योजना बनवा -
  बऱ्याच मुलांची सवय असते की परीक्षा जवळ येतातच ते अभ्यासाला सुरुवात करतात. ही सवय चुकीची आहे. ह्याला अभ्यास म्हणत नाही. म्हणून परीक्षेच्या वेळी वाचलेले सर्व विसरतात तयामुळे तणावात असतात. असं होऊ नये या साठी अभ्यासाची पद्धत आणि योजना बनवा- 
 
* मन शांत ठेवा-
अभ्यासाच्या दरम्यान मानसिक स्थिती चांगली असावी. मन शांत असावे. कारण आपण जे काही अभ्यास करत आहात ते लक्षात राहणे महत्वाचे आहे. मनाला भटकू देऊ नका. ध्यान करून मनाला नियंत्रणात ठेवा. अभ्यास करताना मेंदू ताजे असावे. थकलेले मेंदू काहीच करू शकत नाही.  
 
* अभ्यासाची योग्य वेळ निवडा -
अभ्यासासाठी नियोजन करताना सकाळच्या वेळेला महत्व द्या. सकाळची वेळ अभ्यासासाठी चांगली असते. या वेळी मेंदू फ्रेश असतो आणि लक्षात ठेवण्याची तसेच ग्रहण करण्याची शक्ती जास्त असते. आपण जे काही वाचत आहात त्याला लक्ष देऊन वाचा. जर आपल्यासाठी एखादा विषय नवा आहे तर त्याला घाबरून  न जाता. लक्ष देऊन वाचून घ्या. या साठी आपण काही कोड वर्ड देखील वापरू शकता. जेणे करून वाचलेले लक्षात राहील.
 
* अभ्यासासाठी योग्य जागा निवडा- अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचे आहे योग्य जागेची निवड करणे. जो पर्यंत आपल्या सभोवतालीचे वातावरण अनुकूल नसेल तर आपले लक्ष अभ्यासात लागणार नाही. म्हणून अभ्यासाची जागा शांत असावी. जास्त ऊन नको किंवा जास्त थंडावा नको. पुस्तके रचून ठेवलेली असावी, बसण्यासाठी खुर्ची असावी. टेबल असावे. अशा वातावरणात अभ्यास चांगला होईल आणि  वाचलेले लक्षात राहील.  
 
* अभ्यास कसा करावा- 
सर्व विषय एकत्र करण्याचा विचार करू नका. असं केल्यानं मेंदू अवरुद्ध होईल. प्रत्येक विषयाची वेगवेगळी योजना बनवा जेणे करून ते दीर्घ काळापर्यंत लक्षात राहील.  
अनुशासनचे पालन करा जेणे करून कठीण आणि अवघड वाटणारे काम देखील सहज आणि सोपे वाटतील. आपले सर्व लक्ष एकाच गोष्टी कडे केंद्रित करा. एका वेळी एकच काम करा. सर्व एकत्र करण्यामागे  काम अर्धवट राहतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वारंवार लघवी चा त्रास होत आहे हे उपाय अवलंबवा