Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने होणारे फायदे

उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने होणारे फायदे
हे फळ खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. सोबत यामध्ये व्हिटॅमिन्स 'ए' आणि 'सी'देखील असतात. येथे जाणून घ्या, उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने इतर कोणकोणते फायदे होतात.

वॉटरमेलनवजन कमी करते
यामध्ये कॅलरी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते. या दोन्ही गोष्टी वजन वाढविण्यासाठी पूरक असतात. टरबुजामध्ये आढळून येणारे सिट्रयूलाईन नावाचे तत्त्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्त्व वसा तयार करणार्‍या पेशींना कमी करते. टरबुजामध्ये असलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंगदरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. वर्ष २00७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या र्जनल ऑफ न्यूट्रीशननुसार टरबुजामध्ये उपलब्ध असलेले एमिनो अँसिड आर्जिनीन शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित प्रणाली योग्य ठेवते.
 
ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते 
टरबूज हाय ब्लडप्रेशरला नियंत्रणात ठेवते. यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि एमिनो अँसिड तत्त्व एकत्रितपणे नसांना स्वस्थ आणि मजबूत बनवितात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. हे तत्त्व शरीरातील अँसिड आणि इलेक्ट्रोलाईटमधील संतुलन कायम ठेवते. 
 
यामुळे उच्च रक्तदाबाची शक्यता कमी होते. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीनुसार जास्त वजन असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. या लोकांसाठी टरबूज हा रामबाण उपाय आहे. दररोज एक ग्लास टरबुजाचे ज्यूस प्यायल्यास हाय ब्लडप्रेशरची समस्या नियंत्रणात येऊ शकते.
webdunia
शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवते 
शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही. यामध्ये विविध प्रकारचे हायड्रेशन करणारे तत्त्व उदा. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुम्ही दिवसभर पाणी प्यायले नाही तरी टरबूज त्याची पूर्तता करते. वर्ष २00९ मध्ये अबरदीन मेडिकल युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार टरबुजाप्रमाणे आणखी काही फळांमध्ये मीठ, मिनिरल्स आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण आढळून येते. या फळांमधील पाण्याने शरीराला जास्त फायदा होतो. यामुळे उन्हाळ्यात दोन-तीन ग्लास टरबुजाचे ज्यूस अवश्य घ्यावे.
 
किडनी स्वस्थ राहते
टरबूज खाल्ल्याने मुतखडा (किडनी स्टोन) दूर होण्यास मदत होते. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम किडनीला स्वस्थ ठेवते. हे लघवीतील अँसिडचा स्तर नियंत्रणात ठेवते. पोटॅशियमसोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत मिळते. नियमितपणे टरबुजाचे सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका राहत नाही. टरबुजाच्या बिया खाल्ल्यानेही लाभ होतो.
 
webdunia
मन प्रसन्न राहते
टरबूज रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते आणि लठ्ठपणासुद्धा कमी करते. जे लोक सतत कामाच्या तणावात राहतात त्यांच्यासाठी टरबूज गुणकारी आहे. त्यामुळे डोके शांत आणि मन प्रसन्न राहते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांना टरबूज खाल्ल्यानंतर राग शांत करण्यास मदत होते.
 
हृदय स्वस्थ राहते 
टरबुजामध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम तत्त्व हृदयाला निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी साहाय्यक ठरते. डब्ल्यूएचओ सर्व्हेनुसार हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी व्यक्तीने एक दिवसामध्ये ३,५१0 मिलीग्रॅम पोटॅशियम ग्रहण करणे आवश्यक आहे. टरबूज तुमची ही गरज भागवू शकते.
webdunia
प्रतिकारशक्ती वाढते 
टरबुजामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन 'सी' आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत करते. यामुळे आपण ताप व संक्रमण (इन्फेक्शन)पासून दूर राहू शकतो.
 
डोळ्यांसाठी फायदेशीर 
टरबुजाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर राहते. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन 'ए' भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळे स्वस्थ ठेवण्यात मदत होते. याच्या सेवनाने रातांधळेपणा आणि मोतीबिंदू यांसारख्या डोळ्यांच्या आजारापासून दूर राहिले जाऊ शकते.
webdunia
कॅन्सर 
टरबूज अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन 'सी' तसेच इतर अँटीऑक्सिडेंटचा उत्तम स्रोत आहे. हे कॅन्सरचे कारण मानल्या जाणार्‍या विषाणूंना नष्ट करण्यास सक्षम आहे. अनेक संशोधनांमध्ये लाइकोपेनचे सेवन प्रोस्टेट कॅन्सरसाठी उपयुक्त मानण्यात आले आहे. टरबुजामध्ये लाइकोपेन तत्त्व आढळून येते.
 
पचनासाठी उपयुक्त 
टरबुजामध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे पदार्थ पुन्हा गरम करून खाण्यास घातक