Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुपरफूड काजूचे 5 फायदे

Cashew nuts
, बुधवार, 29 मे 2024 (07:00 IST)
ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कारण यामधून आपल्याला अनेक प्रकारचे पोषकतत्व मिळतात. जे आजारांशी लढायला मदत करतात. रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी नाश्त्यामध्ये आरोग्यदायी पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले असते. ज्यामुळे थकवा जाणवत नाही. तसेच काजू मध्ये प्रोटीन, खनिज,  आयरन, फायबर, फोलेट, अँटीऑक्सीडेंट, मिनरल, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असते. 
 
आरोग्यदायी हृदय- 
काजू हे ओलिक एसिडने परिपूर्ण असतात. जे हृदयाला निरोगी ठेवतात. तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाच्या आजरांचा धोका कमी होतो. 
 
हाडांना मजबूत बनवते-
काजूमध्ये कॅल्शियम आणि फास्फोरस असते जे हाडांना मजबूत बनवते. मॅग्नाशीयम विशेष रूपाने महत्वपूर्ण आहे. नियमित काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस धोका कमी होतो. 
 
रोगप्रतिकात्मक शक्ती वाढते- 
काजूमध्ये जिंक असते, एक मिनरल आहे इम्यूनिटी बनवून ठेवण्यासाठी मदत करते. जिंक इम्यूनिटी सेल्सचे उत्पादन मध्ये मदत करते नियमित आहारात काजू सहभागी केल्यास तुमची रोगप्रतिकात्मक शक्ती वाढते. 
 
डोळ्यांचे आरोग्य वाढते- 
नियमित काजूचे सेवन केल्यास डोळ्यांना देखील खूप फायदा होतो. ल्यूटिन आणि जेक्सैन्थिन सारखे अँटीऑक्सीडेंटने भरपूर काजू डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवतात. 
 
वजन कमी होते- 
काजूचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यासाठी देखील मदत मिळते. काजूमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर निबंध