जीभेवर काळं तीळ नव्हा तर पूर्ण जीभच काळी, कोणता आजार आहे हा... लोकं काळी जीभ त्याला म्हणतात ज्याच्या तोंडातून निघालेले अशुभ घडतं... पण खरंच काळी जीभ असते का तर होय... हा एका प्रकाराचा आजार आहे. या आजाराने एक व्यक्ती त्रस्त आहे. होय अमेरिकेत एक माणासाच्या जीभेवर केस उगून आले आणि त्याची जीभ काळी पडत गेली. डॉक्टरांनी या जीभेवर स्टडी करुन याबद्दल माहिती काढली आणि ती रिपोर्ट JAMA Dermatology जर्नल मध्ये प्रकाशित केली आहे. तर जाणून घ्या या आजाराबद्दल आणि हे देखील जाणून घ्या की काय है कितपत धोकादायक आहे ते-
काय आहे प्रकरण -
JAMA डर्माटोलॉजी जर्नलमध्ये या विकासाबद्दल एक अहवाल प्रकाशित झाला आहे. रिपोर्टनुसार अमेरिकेतील एका व्यक्तीला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्या आजारावर उपचार करून तो बरा झाला. मात्र तो शारीरिकदृष्ट्या अशक्त झाला होता. यानंतर अचानक त्याच्या जिभेवर काळे केस येऊ लागले. किंवा त्याची जीभ काळी पडू लागली. पण सुदैवाने सुमारे 20 दिवसांनंतर त्यांचे जीवन सामान्य माणसासारखे सामान्य झाले.
पण ते 20 दिवस त्याच्यासाठी फार जड गेले कारण जीभ काळी होणे म्हणजे हा एक ब्लॅक हेअरी टंग सिंड्रोम नावाचा आजार आहे. या आजारात जिभेवर तात्पुरते केस वाढतात. यात जिभेवर त्वचेच्या मृत पेशी जमा होऊ लागतात त्यामुळे जीभ काळी पडते कारण त्यावर बॅक्टेरिया जमा होऊ लागतात.
काय असतं ब्लँक हेअरी टंग सिंड्रोम
काळे केस असलेली जीभ एक अस्थायी, हानिरहित मौखिक स्थिती आहे. यात जीभेवरील त्वचेच्या मृत सेल (Dead Skin Cells) उभरुन बाहेरच्या बाजूला जमा होऊ लागतात आणि यामुळे जीभ मोटी होते आणि यावर बँक्टेरिया आणि यीस्ट जमा होऊ लागतात, जे केसांप्रमाणे दिसतात.
लक्षणे
- जिभेचा काळा रंग, तसेच रंग तपकिरी, टॅन, हिरवा, पिवळा किंवा पांढरा देखील असू शकतो.
- जिभेच्या वर काळे केसाळ बॅक्टेरिया
- तोंडाची चव बदलणे
- दुर्गंधी
- गँगिंग किंवा गुदगुल्या होत असल्याचे जाणवणे.
कारणं
काळी केसाळ जीभ सामान्यतः तेव्हा उद्भवते जेव्हा जिभेवरील पॅपिले काही काळा वाढतात कारण ते सामान्य त्वचेच्या मृत पेशी बाहेर टाकत नाहीत. त्यामुळे जीभ केसाळ दिसते. याची काही संभाव्य कारणे असू शकतात
-प्रतिजैविक वापरल्यानंतर तोंडात सामान्य जीवाणूंच्या प्रमाणात बदल
- खराब तोंडी आरोग्य
- कोरडे तोंड (झेरोस्टोमिया)
- पेरोक्साइड सारख्या ऑक्सिडायझिंग एजंट्स असलेल्या माउथवॉशचा नियमित वापर
- तंबाखूचा वापर
- कॉफी किंवा ब्लॅक टी जास्त प्रमाणात पिणे
- अति मद्य सेवन
डॉक्टरांना कधी भेटायचे
काळी केसाळ जीभ चिंताजनक दिसू शकते, यामुळे सहसा कोणतीही आरोग्य समस्या उद्भवत नाही आणि ती सहसा वेदनारहित असतं. जर तुम्हाला तुमच्या जिभेची काळजी असेल तर दिवसातून दोनदा दात आणि जीभ घासून घ्या. तरी हे लक्षणं बराच काळ दिसून येत असतील तर आपण डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.