Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आहार नियोजनाने मधुमेहावर नियंत्रण

आहार नियोजनाने मधुमेहावर नियंत्रण
मधुमेह फार मोठय़ा प्रमाणात पसरलेला आजार आहे. हल्ली तर लहान वयातच मधुमेह होत असल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच ह्या रुग्णांसाठी आहारविहारांचे नियोजन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मधुमेह दिनाच्या (दि. १४ नोव्हेंबर) निमित्ताने काही टिप्स. 
 
लिंबाचा रस : 
मधुमेही रुग्णांना तहान जास्त लागते. या अवस्थेत त्यांनी लिंबाचा रस प्यायला हवा. त्याने त्यांची तहान भागते. 
 
काकडी :
मधुमेही रुग्णांनी थोडा कमी आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांना सारखी भूक लागते. काकडी खाल्ल्याने भूक शांत होऊ शकते. 
 
गाजर-पालकाचा रस :
या रुग्णांनी डोळ्यांसाठी गाजर आणि पालकाचा रस प्यायला हवा. 
 
बीट :
मधुमेही रुग्णांना बीट, दुधी भोपळा, गिलकी, पालक, पपई इत्यादी भाज्यांचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. बीटाने रक्तात 
असलेल्या साखरेची मात्रा कमी होऊ लागते. म्हणून बीट भाजी, परोठे, सलाड आदी प्रकारे खावी. 
 
जांभूळ : 
मधुमेहावर जांभूळ एक पारंपरिक औषध आहे. या फळांना मधुमेहींचे फळही म्हणतात. या फळाची बी, साल, रस आणि गर सर्व मधुमेहींसाठी गुणकारी आहे. जांभळाच्या बिया एकत्र करून ठेवाव्यात. त्यात जांबोलीन नावाचा घटक असतो. स्टार्चचे साखरेत रूपांतर करण्यापासून तो रोखतो. या बियांची बारीक पूड करून ठेवावी आणि दिवसातून २-३ वेळा पाण्यासोबत घ्यावी. यामुळे साखरेचे प्रमाण कमी होते.
 
कारले : 
पूर्वीच्या काळापासून कारल्याचा प्रयोग मधुमेहींच्या औषधाच्या रूपात केला जात आहे. याचा कडू रस साखरेचे प्रमाण कमी करतो. मधुमेही रोग्यांना याचा रस रोज प्यायला द्यायला पाहिजे. उकळलेल्या कडुलिंबाचा रस प्यायल्यास चांगले. 
 
मेथी : 
मधुमेही रोग्यांनी मेथीदाणे पोटात जाऊ द्यावेत. मेथी दाण्याची पूड आता बाजारापर्यंत आली आहे. या पुडीमुळे मधुमेहावर नियंत्रण राहू शकते. हे चूर्ण सकाळी उपाशी पोटी २ चमचे घ्यायला हवे. काही दिवसांत याचे चांगले परिणाम दिसून येतात. 
 
इतर उपचार : 
रोज दोन चमचे कडू लिंबाचा रस, चार चमचे केळीच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घ्यायला हवा. आवळ्याचा रस ४ चमचे घेतल्यानेसुद्धा फायदा होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जास्त मीठ खाल्लयाने होऊ शकतो डायबिटिज