Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवसाच्या उजेडात कमी राहिल्याने नैराश्य

दिवसाच्या उजेडात कमी राहिल्याने नैराश्य
, गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (15:12 IST)
गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात दिवसाच्या उजेडात कमी काळ घालविणार्‍या महिलांमध्ये बाळाच्या जन्मानंतर नैराश्याचा धोका जास्त वाढू शकतो, असा दावा एका ताज्या अध्ययनातून शास्त्रज्ञांनी केला आहे. 
 
या चमूमध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. 293 महिलांवर करण्यात आलेल्या एका अध्ययनाच्या आधारे शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. 
 
अमेरिकेतील सेन जोस स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ दीपिका गोयल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. या अध्ययनाच्या आधारे महिलांना 'ड' जीवनसत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये जास्त वेळ राहण्यासाठी प्रेरित करू शकतील, त्यात जास्त जोखीम असते. 
 
या अध्ययनात सहभागी करण्यात आलेल्या महिलांकडून गर्भावस्थेदरम्यान त्या किती तास दिवसाच्या प्रकाशात राहिल्या, यासंबंधीची माहिती गोळा करण्यात आली. 
 
यासोबतच त्याच्या झोपेच्या तासांबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. या माहितीच्या विश्र्लेषणाआधारे अध्ययनात सहभागी महिलांमध्ये नैराश्याचा धोका 30 टक्के जास्त आढळून आला.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चटपटीत भुट्टयाची भजी