Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Does your body smell like sweat तुमच्या शरीराला घामामुळे वास येतो का? या वासाचा आणि आपल्या खाण्याचा काय संबंध आहे? वाचा

Does your body smell like sweat तुमच्या शरीराला घामामुळे वास येतो का? या वासाचा आणि आपल्या खाण्याचा काय संबंध आहे? वाचा
, सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (15:04 IST)
Does your body smell like sweat जेव्हा हवा उष्ण आणि दमट असते तेव्हा शरीराला जास्त घाम येतो, अर्थात आपल्या त्वचेतून बाहेर पडणारा घामाचा प्रत्येत थेंब आपल्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी मदत करत असतो. शरीर थंड ठेवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. मात्र यामुळे कधीकधी दुर्गंधीही येते.
 
प्रत्येक माणसाला घाम येतो. मात्र त्यांच्या शरीराचा वास वेगवेगळा असतो. काहींच्या शरीराला कमी वास येतो तर काही लोकांना जास्त वास येतो.
 
स्टॉकहोममधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर जोहान लँडस्ट्रॉम यांनी वासांवर संशोधन केले आहे.
 
आपल्या घामाचा वास वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो, असे ते म्हणतात.
 
"आपल्या शरीरातील दुर्गंधी विविध ग्रंथींद्वारे स्रवलेल्या संयुगांपासून उद्भवतात. अशा गंध काही प्रमाणात आपल्या जीन्स, शरीरातील जीवाणू (स्वच्छतेच्या अभावामुळे, अनुवांशिकतेमुळे उद्भवणारे) आणि वातावरण (ओलावा, तापमान, हवा, तणाव) यांच्यामुळे असतात. शेवटी, येतं ते आपलं अन्न. आपण खात असलेल्या पदार्थांचंही शरीराच्या दुर्गंधीतही योगदान असते” असं ते सांगतात.
 
शरीराचा गंध बदलणारे पदार्थ
आपल्याला घाम आल्यावर बाहेर पडणाऱ्या शरीराच्या दुर्गंधीवर अन्नाचा किती प्रमाणात परिणाम होतो हे सर्वांनाच माहीत नसते.
 
" माझ्या माहितीनुसार त्याचं मोजमाप झालेलं नाही", असं जोहान सांगतात. पण कोणत्या पदार्थांचा या वासावर परिणाम होतो हे जाणून घेऊ.
 
ते म्हणाले, "जे लोक भरपूर मांस खातात त्यांच्या शरीराला शाकाहारी लोकांच्या तुलनेत जास्त वास येतो आणि असे पुरावे आहेत की जे लोक त्यांच्या आहारात भरपूर लसूण खातात त्यांच्या घामाला दुर्गंधी येते."
 
शतावरी आणि विविध मसाल्यांचाही शरीराच्या गंधावर परिणाम होतो. पण आपल्या घामात बदल करू शकणार्‍या विशिष्ट पदार्थांचे काय?
 
"मुळात त्यामध्ये रक्तप्रवाहात शोषली जाणारी रसायने असतात. रक्तप्रवाहात प्रवेश करणारी बहुतांश रसायने आपल्या शरीराच्या गंधातून बाहेर पडतात," जोहान म्हणाला.
webdunia
sweat
उदाहरणार्थ, लसूण आणि मांस यांत सल्फर असतं. जेव्हा ते अन्न म्हणून घेतले जातात तेव्हा ते घामासह विविध माध्यमांद्वारे शरीरातून बाहेर टाकले जातात.
 
मांस खाल्ल्याने वाईट वास येतो का?
घामाची दुर्गंधी कमी करण्यावर फारसे संशोधन झालेले नसले तरी, काही खाद्यपदार्थ शरीराची दुर्गंधी कमी करू शकतात, असे अभ्यासातून दिसून आले आहे.
 
असा प्रयोग ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी विद्यापीठात करण्यात आला.
 
43 पुरुषांनी कॉटन टी-शर्ट घालण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ केली. (कोणतेही दुर्गंधीनाशक वापरलेले नाही). घामाच्या ग्रंथींना चालना देण्यासाठी त्यांच्यासोबत तासभर व्यायाम करण्यात आला.
 
एकूण पुरुषांनी 48 तास शर्ट घातले. त्यानंतर टी-शर्ट गंध विश्लेषणासाठी पाठवण्यात आले.
 
संशोधनात असे दिसून आले आहे की जे पुरुष जास्त फळे आणि भाज्या खातात त्यांना घामाचा कमी परिणाम होतो. त्यांच्या शरीराचा गंधही कमी असतो.
 
ज्यांनी चरबी, मांस आणि अंडी खाल्ले, विशेषत: ज्यांनी भरपूर कार्बोहायड्रेट खाल्ले, त्यांना केवळ भरपूर घामच आला नाही तर श्वासाची दुर्गंधी देखील आली.
 
दुसऱ्या अभ्यासात, 17 पुरुषांनी एकतर मांसमुक्त आहार किंवा लाल मांस असलेले आहार खाल्ले. दोन आठवड्यांनंतर घामाचे नमुने गोळा करण्यात आले.
 
एका महिन्यानंतर प्रयोग पुन्हा केला गेला. यावेळी त्या 17 लोकांनी त्यांच्या आहारात बदल केले.
 
शेवटी महिलांच्या एका पॅनेलने या पुरुषांच्या घामाचे मूल्यांकन केले.
 
अभ्यासातील सहभागींना असे आढळून आले की जेव्हा त्यांनी शाकाहारी आहार घेतला तेव्हा त्यांच्या शरीरातील घामाचा वास अधिक सुसंगत आणि आनंददायी होता. मांस खातात त्यांच्या शरीरातून येणार्‍या घामामुळे दुर्गंधी येते, असं यातून दिसलं.
 
आपण आपला आहार बदलल्यास काय होईल?
तसेच यावेळी संशोधकांनी महिलांवर एक अभ्यास केला. याचाच एक भाग म्हणून पुरुषांनी महिलांच्या घामाची तपासणी केली.
 
सुरुवातीला महिलांना विशिष्ट आहार आणि काही दिवस सामान्य आहार देण्यात आला. परंतु असे आढळून आले आहे की महिलांच्या घामाला विशिष्ट आहार घेण्यापेक्षा सामान्य आहार घेतल्यास दुर्गंधी येत नाही.
 
मग तुमच्या शरीराची दुर्गंधी सुधारण्यासाठी तुमच्या आहारात बदल करणे योग्य आहे का? याचा अर्थ तुमचा आहार बदलण्याऐवजी "डिओडोरंट आणि परफ्यूम वापरणे सोपे आहे", जोहान म्हणतात. पण दुर्गंधी वाईट नाही, असेही ते म्हणाले.
 
"तथापि, शरीराच्या गंधाबद्दल लोकांचे मत भिन्न आहे," जोहान सांगतात.
 
"उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत बेडरूममध्ये असता तेव्हा तुम्हाला जो शरीराचा वास येतो तो वास तुम्ही जिममध्ये असताना शरीराच्या गंधापेक्षा वेगळा असतो. तसेच बसमध्ये प्रवास करताना तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीच्या शेजारी बसलात तर त्यांच्या शरीराचा वासही तुम्हाला वेगळाच जाणवेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्या शरीराचा नैसर्गिक गंध आवडू शकतो. खरं तर, तुम्हाला कोण आवडतं हे शोधण्याचा हा एक मार्ग आहे," असं जोहान म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ZP 2023 - 19000 पदांसाठी मेगा भरती