Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी करायचा असेल तर खा सी फूड

Foods - Reheating
, बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (23:09 IST)
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-2 मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
 
अनेक लोकांना सी फूड खाणं खूप पसंत असतं. एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला की, सी फूडचे सेवन केल्यानं निरोगी राहण्यासोबत टाईप-2 मधुमेह सारख्या आजारालाही टाळता येतं. जर तुम्हाला सी फूड खाणं पसंत असेल तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आनंदी करू शकते. अथेन्स विद्यापीठानं नुकतंच एक नवं संशोधन केलंय. सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांची मात्रा कमी असते. त्यामुळं सी फूड खाणारी व्यक्ती, टाईप-2 मधुमेहापासून वाचू शकते, असा निष्कर्ष या संशोधनातून स्पष्ट झालंय. 
 
अथेन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी 11 वर्षापर्यंत जवळपास 23,000 लोकांवर याची पडताळणी केली. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. संशोधनात सहभागी झालेल्या लोकांकडून एक प्रश्नावली भरण्यात आली होती. या प्रश्नावलीत आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीची माहिती सांगायची होती. ज्या लोकांनी नियमित सी फूडचे सेवन करत असल्याचं सांगितलं, त्यांच्या शरीरात चरबीचं प्रमाण जास्त आढळलं नाही आणि यामुळं त्यांच्यामध्ये टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्लेंचे निधन