Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाभी मध्ये तेल टाकल्यावर काय होते जाणून घ्या

Olive Oil, Health Benefits of Olive Oil, Coconut Oil, What is Olive Oil, Heath News Malayalam, Webdunia Malayalam
, सोमवार, 18 मार्च 2024 (19:30 IST)
Benefits of oil in navel- नाभीमध्ये तेल टाकल्यास आरोग्यासंबंधित सर्व समस्या दूर होतात. नाभीमध्ये तेल टाकणे हा एक प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहे. तेल हे नाभीचक्राला सक्रीय करते. जर तुमचे नाभीचक्र बिघडले असेल तर आरोग्यासंबंधित अनेक समस्या तुम्हाला येऊ शकतात. नाभी ही शरीरातील अनेक नसांना जोडलेली असते. जर नाभीमध्ये तेल टाकले तर याचे लाभ शरीराला मिळतात. 
 
बेली बटन म्हणजेच नाभीमध्ये तेल टाकायचे अनेक फायदे आहे. जर तुम्ही रोज नियमित तुमच्या नाभीमध्ये तेल टाकले तर तुमच्या सौंदर्यात भर पडते. तसेच तुमचे कोरडया झालेल्या ओठांना देखील पोषण मिळते. जर चेहऱ्यावर मुरुम आले असतील आणि त्वचा जर चमकदार हवी असले तर नाभीमध्ये तेल टाकावे. तसेच हे जाणून घेणे गरजेचे आहे की कुठल्या वातावरणात कुठले तेल टाकावे चला तर जाणून घेऊ या. 
 
उन्हाळा- उन्हाळ्यात तुम्ही नाभीमध्ये कडुलिंबाचे आणि नारळाचे तेल टाकू शकतात. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळया असतील तर नाभीमध्ये कडुलिंबाचे तेल रात्री झोपण्यापूर्वी टाकावे .कडुलिंबाचे तेल नाभीत टाकल्यास मुरुम, पुटकुळया या समस्या दूर होतात. व नारळाचे तेल नाभीत टाकल्यास त्वचेमध्ये ओलावा राहतो व ओठ हे मुलायम राहतात. 
 
हिवाळा- थंडीच्या दिवसांत तुम्ही नाभीमध्ये बादाम किंवा ऑलिव्ह तेल टाकू शकतात.  या तेलांच्या उपयोगमुळे थंडीमध्ये कोरडी त्वचेची समस्या दूर होते. व चेहऱ्याच्या सौंदर्यात वाढ होते. 
 
पावसाळा- पावसाच्या दिवसांमध्ये नाभीमध्ये बदामाचे तेल टाकावे यामुळे चेहऱ्यावर चमक येते. तसेच पावसाळ्यात केसांना जो कोरडेपणा येतो तो कमी होतो. 
 
जर तुम्ही रोज नियमित झोपण्यापूर्वी दोन थेंब नाभीत टाकाल तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊन अनेक आश्चर्यजनक फायदे मिळतील. नाभीमध्ये रोज तेल टाकल्याने फाटलेले ओठ मऊ आणि गुलाबी होतात. तसेच डोळ्यांचे जळजळ, खाज, कोरडेपणा देखील कमी होतो. शरीरातील कुठल्याही भागाला जर सूज येत असेल तर नाभीत तेलाचे दोन थेंब टकल्याने समस्या नष्ट होते. मोहरीचे तेल नाभीत टकल्यास गुढगे दुखायचे थांबतात. तसेच नाभीत मोहरीचे तेल टकल्यास चेहऱ्याचे  सौंदर्य वाढते. तसेच मुरुम, पुळया, डाग यांसारख्या समस्या देखील नष्ट होतात. नाभी वर मोहरीचे तेल टाकल्यास आपले पाचनतंत्र देखील सुरळीत राहते.   
 
नाभीत तेल टकल्याने पोटाचे दुखणे बरे होते. अपचन, फूड पॉइजनिंग,बद्धकोष्ठता, उलटी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. या समस्याकरिता पिपरमिंट ऑइल आणि जिंजर ऑइलला कुठल्याही इतर तेलात मिक्स करून पातळ करावे व नाभीवर लावावे. 
 
नाभीमध्ये बदमाचे तेल टाकल्यास त्वचा उजळते. जर तुम्ही मुरुम या समस्येमुळे चिंतित असाल तर कडुलिंबाचे तेल नाभीत टाकावे यामुळे मुरुम पासून आराम मिळेल. तसेच डाग देखील दूर होतात. नाभी ही प्रजनन तंत्राशी जोडलेली असते म्हणून नाभीत तेल टाकल्यास प्रजनन क्षमता विकसित होते. तसेच नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइल नाभीमध्ये टाकल्याने महिलांमधील हार्मोन संतुलित राहतात आणि गर्भधारणेची संभावना वाढते. नाभीमध्ये तेल टाकल्याने पुरुषांच्या शरीरामध्ये शुक्राणूंची संख्या वाढते व ते सुरक्षित होतात. तसेच रोज नाभीत नियमित तेलचे दोन थेंब टाकल्यास चांगली झोप देखील लागते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरच्या घरीही दूध बनवता येतं, हे आहेत पर्याय