Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिडचिडेपणा टाळू शकता

चिडचिडेपणा टाळू शकता
काही लोकांमध्ये वयानुसार चिडचिडेपणा कमी व्हायला पाहिजे, पण तो आणखी वाढत जातो. मात्र या साठी सतत कामात असणे गरजेचे आहे. तसेच काही-काही व्यायामदेखील आहेत.
 
व्यायामाचा चांगला परिणाम - जर तुम्ही आठवड्यातून किमान तीनवेळा व्यायाम केला तरी तुमच्या चिडचिडेपणामध्ये फरक जाणवेल. चिडचिड होत असल्यास दररोज थोडा व्यायाम करा. यामध्ये 10 मिनिटे पायी चालणे तसेच 45 मिनिट वर्कआऊट तुम्ही करू शकता.
 
बागकाम करा - बागकाम केल्याने हात खराब होतील या विचाराने अनेकजण हे काम टाळतात. मात्र बागकाम केल्याने मेंदूकडून येणार्‍या एका विशिष्ट केमिकलमध्ये वाढ होते. यामुळे चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. तसेच हे काम केल्याने व्यायामदेखील होतो.
 
मेडिटेशन केव्हाही उत्तम - मेडिटेशन केल्याने तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित राहाते. मेडिटेशन करणे केव्हाही उत्तम. परिणामी चिडचिडेपणा हा कमी होतो. यामुळे डोक्यातील विचार आपोआप निघून जातात. 
 
योगदेखील महत्त्वाचा - योग हा मेडिटेशनचाच एक भाग आहे. योगामध्ये असणार्‍या काही पद्धती किंवा आसने यामुळे शरीरातील स्नायू आणि टिश्यू ताणले जातात. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रणात राहून चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, योग करतवेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मसाज करणे चांगला उपाय - मसाज करणे हात, पाय, पाठ यामधील स्नायू आणि टिश्यूंसाठी उत्तम असते. यामुळे स्नायू ताणले जातात. परिणामी ताण आणि चिडचिडेपणा येत नाही.
 
शांत झोप घ्या - झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर काम करू नये. तसेच नियमित व्यायाम केल्याने देखील शांत झोप लागण्यास मदत होते. जर तुम्हाला दररोज पुरेशी झोप मिळत नसेल तर चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता असते. व्यक्तीला 7 ते 9 तास झोप मिळणे गरजेचे असते. पुरेशी आणि शांत झोप मिळण्यासाठी खोलीत थंडावा, थोडा अंधार आणि शांतता असणे आवश्यक आहे.
 
टिप्स :- ताणतणावापासून मुक्तीसाठी व्यायामाला महत्त्वाचे स्थान द्या. नियमित व्यायाम केल्याने ताण कमी होण्यास मदत मिळते. सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी वॉकला जा.
 
जर आपण एखाद्या आजाराने किंवा शरीरातील बदलामुळे तणावग्रस्त आहात, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उदा. डोक्यावर केस गळत आहेत, याचे टेंशन तुम्ही घेतले असेल तर काळजी करण्यापेक्षा त्यावर उपाय करा, हेअर ट्रान्सप्लांट करा, औषधे घ्या, प्राणायाम करा. जेवणात प्रोटीन असलेले पदार्थ असू द्या.
 
जर आपल्यासोबत काहीसे असे घडत असेल, ज्याचा विचार करून ताण वाढतोय. तर आपल्या या नकारात्मक घटना दूर सारा आणि त्याचा विचार न करता चांगल्या गोष्टींचा विचार करा.
 
नवरा-बायकोच्या नात्यात ताणतणाव असेल तर जवळच्या मित्रांसोबत किंवा घरातील मंडळींसोबत चर्चा करा. यासाठी मॅरेज काउंसलरची मदत घेऊ शकता.
 
आर्थिक परिस्थितीच्या कारणाने तणावग्रस्त असाल तर शांत डोक्याने आपल्याजवळ किती पैसा आहे आणि कायदेशीर मार्गाने आपण आपला इन्कम कसा वाढवू शकतो, याबाबत विचार करा. उगाच टेंशन घेऊ नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समस्या फ्रोजन शोल्डरची