Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाढत्या वयातील त्रास ठेवा दूर

वाढत्या वयातील त्रास ठेवा दूर
वाढत्या वयात अनेक आरोग्य आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात. वयाबरोबरच होणारे हार्मोन्सच्या बदलांमुळे पांढरे केस, त्वचा कोरडी होणे, सुरकुत्या पडणे, स्थूलपणा, रक्तदाब, पचनसंस्थेचे बिघाड, हृदयविकाराचा धोका वाढतो. 
 
वाढत्या वयाबरोबर काही समस्यांचा सामना करावा लागतो. काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येते. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि नारळाच्या तेल यांच्या वापराने म्हातारपणी होणारे काही त्रास कसे दूर ठेवता येतील. वाढत्या वयात होणार्‍या या समस्या कशा दूर ठेवता येतील पाहू या.
 
नारळाच्या तेलाचे फायदे - 
 
स्थूलता- वाढत्या वयात काही व्यक्तींमध्ये स्थूलता वाढीस लागते. ज्याचा परिणाम आरोग्यावर आणि हृदयावर होतो. रोज 2 मोठे चमचे नारळाचे तेल एक महिना सेवन केल्यास स्थूलता कमी होते. 
 
दातांची समस्या- नारळाच्या तेलाचा दातांना फायदा होतो. तोंडातील जीवाणू मारण्यासाठी, दात-हिरड्या यांच्यातील वेदना, दात किडणे, तोंडातून येणारी दुर्गंधी दूर करण्यास नारळाच्या तेलाचा उपयोग होतो. 
 
त्वचेचा मऊपणा- 50 वयानंतर त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचा खरखरीत होते. तसेच सुरकुत्याही पडू लागतात. त्यासाठी चेहर्‍यावर नारळाचे तेल लावावे. त्यामुळे त्वचा मॉश्चराईज होते आणि ती कोरडी पडत नाही. 
 
केसांच्या समस्या- वयाबरोबर केस पांढरे होणे अगदी स्वाभाविक आहे पण अनेक वाढत्या वयात केस गळणे आणि कोंडा यांचीही समस्या निर्माण होते. त्यावर नारळ तेलाची मालिश करून फायदा होतो. 
 
अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे फायदे - 
रक्तातील साखर- अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्या टाइप 2 मधुमेहासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी त्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. 
 
पचनक्रिया खराब असल्यास - पचनक्रिया खराब झाल्यास बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी होते तेव्हा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मधाबरोबर सेवन करावे. त्यामुळे काहीच तासात आराम वाटू लागतो. 
 
घशाची खवखव - घशाची खवखव दूर करण्यासाठी रोज पाण्यात 4 औंस अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर टाकून ते दिवसातून कमीत कमी तीनवेळा प्यावे. त्यामुळे घशाच्या खवखवीबरोबर संसर्गाचा धोकाही कमी होतो.
 
साभार : अपर्णा देवकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंबा रस बुंदी