Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Coronavirus Safety : केकवरील मेणबत्ती फुंकर मारून विझवणे टाळा

Coronavirus Safety : केकवरील मेणबत्ती फुंकर मारून विझवणे टाळा
, सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (12:30 IST)
आपली संस्कृती ही निसर्गाची पूजा करणारी होती. दगडात देखील भवगंताचे वास मानून पूजा करणारी होती परंतू हल्लीच्या शिक्षणपद्धतीने आपल्याच संस्कृतीला खालच्या दर्जेचे मानण्यास आरंभ केले. गायीचा सांभळ सोडून कुत्र्याला प्रेम लावणे शिकवले. आपली पद्धत, परंपरा मागसलेल्या वाटू लागल्या परंतू कोरोना काळात पुन्हा एकदा याची जाणीव झाली आहे की हात मिळवण्यापेक्षा हात जोडून आदरभावाने नमस्कार करणे कधीही आरोग्यासाठी फायद्याचे आहे. आता ही गोष्ट पूर्ण जग मानत आहे.
 
बाहेरच्या चपलांना घरात प्रवेश नको, बाहेरुन आल्यावर हात-पाय धुणे, घरातच उच्च दर्जेचा आहार ग्रहण करणे, आहारात मसाल्यांचा समावेश आणि देशातील अनेक गोष्टींचे विदेशात पालन होऊ लागले आहे. त्यापैकीच आम्ही पत्करलेली एक नवीन विदेशी परंपरा म्हणजे वाढदिवसाला पूजा - पाठ, देवांचे नाव न घेता केक बनवून पार्टी साजरी करायची. त्यात काही वाईट नसलं तरी कोरोनाच्या काळात केकवरील मेणबत्ती फुंकर मारून विझवणे मात्र आरोग्यासाठी धोक्याचं ठरु शकतं.
 
एका शोधाप्रमाणे सुद्धा जेव्हा वाढदिवसानिमित्त केकवर ठेवलेली मेणबत्ती विझवली जाते, तेव्हा मुखातून जिवाणु जाऊन केकवर पडतात, असा केक खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ही गोष्ट पूर्वी अतिशक्योति वाटत असली तरी आता मात्र अनेकांना हे कारण पटेल.
 
नंतर तोच केक उष्ट्या माष्ट्या हाताने एकमेकांना भरवणे आता तरी बंद व्हायले हवे असे संसर्गापासून वाचणार्‍यांना तर नक्कीच वाटतं असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओणम स्पेशल - अवियल