Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 March 2025
webdunia

काय सांगता,पिंपळाचे पान खाणे फायदेशीर आहे

काय सांगता,पिंपळाचे पान खाणे फायदेशीर आहे
, शनिवार, 20 मार्च 2021 (09:50 IST)
पिंपळाचे पान चांगल्या आरोग्यासाठी  फायदेशीर आहे. या मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.पिम्पाचे बियाणं,फळ आणि कळ्या देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या मुळे अनेक गंभीर आजारापासून मुक्तता मिळवू शकतो. पिंपळ पानाचा वापर करून दमा, बद्धकोष्ठता, त्वचेचे आजार देखील दूर करता येतात. चला याचे फायदे जाणून घेऊ या. 
 
* पोटाच्या तक्रारीसाठी पिंपळाची 4 -5 पाने वाटून पेस्ट बनवून घ्या. या मध्ये गूळ मिसळा आणि लहान गोळ्या बनवून याचे सेवन करावे. 
 
* दम्यासाठी फायदेशीर - या साठी पिंपळाच्या सालांपासून बनलेल्या भुकटीचे सेवन करा. नियमित पणे हे 3 ते 4 वेळा खा. दम्याच्या त्रासापासून आराम मिळेल. 
 
* त्वचेच्या आजारापासून सुटका- त्वचेचे आजार दूर करण्यासाठी  पिंपळाची पाने चावून खा, या मुळे त्वचेचे आजार बरे होतात. 
 
* टाचेच्या भेगापासून आराम- पिंपळाच्या पानांचा रस टाचांवर लावल्याने टाचेच्या भेगा बऱ्या होतात. 
 
* बद्धकोष्ठतेचा त्रासापासून आराम- बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करण्यासाठी पिंपळाच्या 5 -10 फळांचे सेवन करावे. 
 
* डोळ्यात वेदना पासून आराम - डोळ्यात वेदना जाणवत असल्यास पिंपळाच्या पानाचे दूध लावल्याने वेदना कमी होते. डोळ्यात संसर्ग झाले असल्यास पिंपळाचे पान डोळ्यावर लावल्याने संसर्ग बरा होतो.  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डेनिम जॅकेट घालून स्वतःला स्टायलिश लुक द्या