Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंजिनिअर पतीकडून हुंड्यासाठी पत्नीला मारहाण; चौघांवर FIR दाखल

इंजिनिअर पतीकडून हुंड्यासाठी पत्नीला मारहाण; चौघांवर FIR दाखल
, शुक्रवार, 19 मार्च 2021 (10:02 IST)
हुंड्याचे राहिलेले पैसे व पुण्यात घर घेण्यासाठी चार ते पाच लाख रूपये आणावेत म्हणून विवाहितेला मारहाण करून घरातून कायमचे हाकलून देणा-या साॅप्टवेअर इंजिनिअर पती, सासू, सासरे व दीर यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी प्रियंका जिवन पवार (वय 24) रा. पोंधवडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती जिवन अगतराव पवार, सासू सुनिता अगतराव पवार, सासरे अगतराव धोंडीबा पवार व दीर बाळकृष्ण आगतराव पवार (सर्व रा. पोंधवडी भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
 
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2018 मध्ये फिर्यांदी प्रियंका यांचा पोंधवडी येथील साॅप्टवेअर इंजिनिअर, जिवन पवार यांच्याशी विवाह झाला. लग्नात फिर्यादीच्या वडिलांना 2 तोळे सोने व 1 लाख रूपये हुंडा व सर्व साहित्य व पूर्ण मानपान दिला होता. लग्न झाल्यानंतर दोन महिने संसार सुखात झाला. मात्र, त्यानंतर पत्नीने माहेरून हुंड्याचे राहिलेले पैसे व पुण्यात घर घेण्यासाठी चार ते पाच लाख रूपये आणावेत यासाठी पतीने वारंवार उपाशी ठेवत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर सासू – सासरे व दीर यांनीही फिर्यादीला मानसिक व शारीरिक त्रास देत छळ केला.
 
तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. 27 जुलै 2020 रोजी वरील सर्वांनी फिर्यादीच्या भावाला बोलावून घेतले व लग्नामध्ये राहिलेला 1 लाख हुंडा घेऊन ये, तरच तिला नांदवितो असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत घरातून फिर्यादीला हाकलून दिले. त्यानंतर 3 मार्च 2021 रोजी पती, सासु, सासरा, व दीर हे सर्वजण मिळुन फिर्यादीच्या माहेरी कौठळी येथील घरी आले. त्यावेळी फीर्यादी यांचे आई – वडील कामानिमित्त बारामतीला गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या पतीने हुंड्याचे पैसे कसे देत नाहीत, तेच बघतो असे म्हणत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, लग्न सोहळ्यात नवरदेवासह १६ वऱ्हाडी पॉझिटीव्ह