Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, लग्न सोहळ्यात नवरदेवासह १६ वऱ्हाडी पॉझिटीव्ह

बाप्परे, लग्न सोहळ्यात नवरदेवासह १६ वऱ्हाडी पॉझिटीव्ह
, शुक्रवार, 19 मार्च 2021 (09:06 IST)
नाशिक इगतपुरी तालुक्यात झालेल्या एका लग्न सोहळ्यात नवरदेवासहित तब्बल १६ वऱ्हाडी  कोरोना बाधित झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.  इगतपुरी तालुक्यात जवळपास ३० रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षक हे टाकेद परिसरामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी गेले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
 
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मालुंजे परिसरामध्ये एका विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे आता पुढे आले आहे. विशेष म्हणजे दोन विवाह एकाच वेळेस आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत वऱ्हाडींपैकी १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उर्मिला मातोंडकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या ‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय ?’