कोरोना विषाणू चा वेग मंदावत आहे.परंतु इतर गंभीर आजार मोठ्यांपासून मुलांपर्यंत दिसून येत आहे.मोठ्यांमध्ये तर वेगवेगळे प्रकारचे जीवघेणे आजार उद्भवत आहे.तर मुलांमध्ये कोविड नंतर मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम(MISC)आजार आढळत आहे.गेल्या वर्षी 2020 च्या तुलनेत या वर्षी 2021 मध्ये कोविड -19आणि MISCची प्रकरणे सतत समोर येत आहेत. मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम म्हणजे काय, लक्षणे आणि उपाय म्हणजे काय ते जाणून घेऊ या.
मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम काय आहे?
हे आजार कोविड -19 पासून बरे झाल्यावर मुलांमध्ये आढळत आहे किंवा कुटुंबातील एखाद्याला हा आजार झाल्यावर अंतर राखून खबरदारी घेण्यास सांगितले जात आहे.कोविड-19 संसर्गा पासून मुले बरे झाल्यावर कुटुंबातील सदस्यांनी मुलांची किमान 6 ते 8 आठवडे काळजी घ्यावयाची आहे.कारण हे आजार कोविड -19 पासून बरे झाल्यावरच उद्भवत आहे. कोविड -19 पासून बरे झाल्यावर संरक्षण यंत्रणा शरीरात अति सक्रिय होते.यामुळे पचन तंत्र,हृदय, फुफ्फुसे,रक्तवाहिन्या,मेंदू सारख्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो.या मुळे त्यात सूज येते.
या आजाराचे सर्वाधिक प्रकरणे अमेरिका आणि युके मध्ये येत होते.परंतु आता भारतात देखील याचा प्रभाव वाढत असताना दिसत आहे.
मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणे-
ताप येणं,पोटात दुखणे, हृदय,फुफ्फुसात समस्या होणं,शरीरात लाल पुरळ येणं,डोळे लाल होणं,जीभ लाल होणं,हा आजार सहसा कळून येत नाही.
मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम टाळण्याचे उपाय-
नॅशनल हेल्थ मिशन ऑफ युरोपच्या म्हणण्यानुसार, या आजाराची नमूद केलेली लक्षणे बघून रुग्णाला त्वरित रुग्णालयात नेले पाहिजे. इंट्राव्हेन्स इम्युनोग्लोब्युलिन अँटीबॉडी आणि ऍस्पिरिन ही दोन प्रकारची औषधं आहेत ज्यामुळे हा रोग बरा होतो.डॉक्टर लक्षणांनुसार कॉर्टिकोस्टेरॉईड्स देखील दिले जाते. पण सर्व वेगवेगळ्या लक्षणांनुसारऔषधे दिले जाते.