समजा तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर तुमच्यात नैराश्याची शक्यता फार कमी होते. कोलोराडो-बोल्डर विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या अध्ययनातून हे समोर आले आहे. या अध्ययनाचे प्रुखम सेलिन वेटर यांनी सांगितले की, सकाळी लवकर उठणे लाभदायक असते. लवकर उठून कुणीही त्याचा परिणाम अनुभवू शकते. याउलट जे लोक रात्री उशिरा झोपतात, त्यांच्या नैराश्याची शक्यता दुप्पट असते. कारण रात्री उशिरा झोपणार्यांचा विवाह होण्याची शक्यता कमी होते व ते एकाकी जीवन जगण्याची शक्यता जास्त असते. यामुळे धूम्रपान व अनियमित झोपेचा पॅटर्न विकसित होतो, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले. झोपेची कमतरता, व्यायाम, बाहेर जास्त वेळ घालविणे, रात्री चमकदार प्रकाशाचा संपर्क व दिवसाच्या उजेडात कमी वेळ घालविणे ही सगळी नैराश्याला आमंत्रण देऊ शकतात. सायकेट्रिक रिसर्च नियतकालिकात या अध्ययनाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात शास्त्रज्ञांच्या चमूने क्रोनोटाइपच्या (रात्री जागणारे लोक) दरम्यानचा संबंध जाणून घेण्यासाठी 32 हजार महिला नर्सच्या माहितीचे विश्र्लेषण केले. त्यात24 तासांतील विशिष्ट वेळेत व्यक्तीची झोपेची प्रवृत्ती, झोपणे-जागण्याची आवड व मनोविकारांचा समावेश आहे. वेटर यांनी सांगितले की, या अध्ययनाचे निष्कर्ष क्रोनोटाइप आणि नैराश्याची जोखीम यांच्यात किरकोळ संबंध दाखवतात. हे क्रोनोटाइप आणि मनोवस्थेशी संबंधित अनुवांशिक मार्गाच्या ओव्हरलॅपशी संबंधित आहेत.