Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपताना करा हे उपाय, वजन कमी होण्यास मदत मिळेल

झोपताना करा हे उपाय, वजन कमी होण्यास मदत मिळेल
, बुधवार, 18 एप्रिल 2018 (13:58 IST)
काही वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांमध्ये हे लक्षात आले आहे की जर झोपताना आम्ही काही गोष्टींकडे लक्ष्य दिले तर वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. यात सर्वात मोठा नियम तर चांगली आणि साउंड स्लिप घेण्याचा आहे. यासाठी आम्हाला बर्‍याच गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे. तर जाणून घेऊ काय आहे त्या गोष्टी.
1. डार्क रूम
काय करावे : नाइट लाइटचा वापर करू नये. खोली पूर्णपणे डार्क करून झोपावे.
 
काय होईल : नाइट लाइटमध्ये झोपल्याने झोप डिस्टर्ब होते. कमी गाढ झोप लागल्याने वजन वाढत. बॉडीत बनणारे मेलाटॉनिन हॉर्मोन झोप आणण्यात मदत करतो. लाइटमध्ये झोपल्याने हे हार्मोन कमी बनतात. (द अमेरिकन जर्नल ऑफ इपिजिमियोलॉजीची रिपोर्ट)
 
2. ठंडक
काय करावे : झोपताना खोली थंडं ठेवावी. जर AC असेल तर त्याचा टेंपरेचर कमी ठेवावा.
 
काय होईल : रात्री झोपताना टेंपरेचर जेवढे थंड राहील, तेवढेच टमीवरील फॅट कमी करण्यास मदत मिळेल. थंड्या टेंपरेचरमध्ये बॉडीला गरम ठेवण्यासाठी बॉडीत जमलेले फॅट बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. (डायबिटीज़ जर्नल)
 
3. प्रोटीन शेक
काय करावे : झोपण्याअगोदर प्रोटीन शेकचे सेवन करावे. डिनरमध्ये देखील प्रोटीन असणारे खाद्य पदार्थ घ्यावे.
 
काय होईल : झोपण्याअगोदर प्रोटीन शेक घेतल्याने बॉडी हे डाइजेस्ट करण्यासाठी जास्त कॅलोरी बर्न करते. तसेच सकाळी उठल्यानंतर देखील बॉडीचे मेटाबॉलिक रेट हाय राहील, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळेल. (फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीची स्टडी)
 
4. अमीनो अॅसिड्स
काय करावे : अमीनो ऍसिड्सचे सोर्स असणारे फूड्स जसे फिश, चिकन, नट्स, डाळी, अंडी डाइटमध्ये सामील करा.
 
काय होईल : अमीनो अॅसिड्स गाढ झोप आणण्यात मदत करतात. हे फूड्स डिनरमध्ये सामील केले तर चांगली झोप येते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. (प्रोग्रामिंग ऍड ऑपरेशन्स जर्नल)
 
5. मिंट
काय करावे : झोपण्याअगोदर खोलीत मिंटची सुगंध असणारी कँडल लावायला पाहिजे किंवा मिंट ऑयल उशीवर लावायला पाहिजे.
 
काय होईल : मिंटची सुगंध वजन कमी करण्यास मदत करते. जर दिवसातून 2 तास मिंटची सुगंध घेतली तर याने मदत मिळेल. (जर्नल ऑफ न्यूरोलॉजी ऍड ऑर्थोपीडिक मेडिसिनची स्टडी)
 
6. होल ग्रेन
काय करावे : दिवसातून एखाद्या मिलमध्ये होलग्रेन सामील करायला पाहिजे, हे हेल्दी कार्ब्स असतात. डिनरमध्ये कार्ब्सचे सेवन करू नये.
 
काय होईल : कार्ब्समध्ये उपस्थित सेरेटॉनिन, मेलाटॉनिनमध्ये बदलून जातात, जी चांगली झोप येण्यास मदत करतात. गाढ झोप आल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. (व्हिसलर फिटनेस वेकेशन्सची रिपोर्ट)
 
7. डिनर टाइम
काय करावे : रात्री 8 वाजेपर्यंत डिनर करून घ्यावे. झोपण्याच्या 2 तास आधीपासून खाद्यपदार्थांचे सेवन करणे बंद करावे.
 
काय होईल : दिवसा गरिष्ठ भोजन केल्यानंतर देखील जर रात्री 8 नंतर काहीही न खाल्ले तर वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. झोपण्याअगोदर खाल्ल्याने फूड ट्रायग्लासराइड्समध्ये बदलून जातो आणि वजन वाढत. (जर्नल सेल मेटाबॉलिझमची रिपोर्ट)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्या माहीत आहे का रवा खाण्याचे 6 फायदे ?