Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धू्म्रपनामुळे बहिरेपणाचा धोका

धू्म्रपनामुळे बहिरेपणाचा धोका
धुम्रपनामुळे बहिरेपणाचा धोका असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासासाठी 50,000 लोकांचा आठ वर्षांसाठी अभ्यास करण्यात आला होता. जपानधील जागतिक आरोग्य आणि औषध केंद्रातील संशोधकांनी लोकांच्या वर्षिक आरोग्य चाचणीतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. 
 
यामध्ये अभ्यासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींना आरोग्य आणि जीवनशैलीविषयक प्रश्र्न विचारण्यात आले. अभ्यासात धू्म्रपान करणार्‍या, धू्म्रपान सोडून दिलेल्या आणि कधीही धू्म्रपान न केलेल्या लोकांची तपासणी केली. यावेळी एका दिवसात किती वेळा धू्म्रपान केले जाते आणि किती प्रमाणात धू्म्रपान केल्याने श्रवण यंत्रणेला धोका होतो याचे विश्लेषण करण्यात आले. 
 
कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्र मोठ्या प्रमाणात असणारे ध्वनिप्रदूषण आदी घटकांचे समायोजन केल्यानंतर धू्म्रपान करणार्‍यांमध्ये कधीही धू्म्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत 1.2 ते 1.6 टे जास्त धोका असल्याची संशोधकांनी नोंद केली. धू्म्रपानामुळे कमी तीव्रतेच्या ध्वनी लहरींच्या तुलनेत उच्च तीव्रतेच्या ध्वनिलहरी ऐकण्याची क्षमता कमकुवत होते. धू्म्रपान सोडण्याच्या पाच वर्षांनंतर बहिरेपणाचा धोका कमी होतो. 
 
मोठ्या कालावधीसाठी भरपूर लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून धू्म्रपान बहिरेपणाचा धोका निर्माण करू शकत असल्याचे सबळ पुरावे समोर आले आहेत, असे जपानधील जागतिक आरोग्य आणि औषध केंद्रातील हुआनहुआंग हू यांनी सांगितले. बहिरेपणाचा धोका टाळण्यासाठी तंबाखूचे सेवन टाळणे गरजेचे असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे, असेही हू यांनी सांगितले. हा अभ्यास निकोटिन आणि टोबॅको रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन!