Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या लेडीफिंगर (भेंडी)चे 10 कमालीचे फायदे

जाणून घ्या लेडीफिंगर (भेंडी)चे 10 कमालीचे फायदे
लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्‍याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. पण भेंडीच्या या फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल. जाणून घ्या भेंडीचे 10 अनमोल फायदे...
1 कँसर - भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर करण्यासाठी भेंडी फारच फायदेशीर असते. ही आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास मदत करते, ज्याने तुमच्या आतड्या स्वस्थ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात.   

2  हृदय - भेंडी तुमच्या हृदयाला देखील स्वस्थ ठेवते. यात उपस्थित पॅक्टिन कोलेस्टरॉलला कमी करण्यास मदत करतो. तसेच यात असणारे विरघळणारे फायबर, रक्तात कोलेस्टरॉलला नियंत्रित करतो, ज्याने हृदय रोगाचा धोका कमी राहतो.  
webdunia
3  डायबिटीज - यात असणारा यूगेनॉल, डायबिटीजसाठी फारच फायदेशीर असतो. हा शरीरात ग्लोकोजच्या स्तराला वाढवण्यापासून बचाव करतो, ज्याने डायबिटीज होण्याचा धोका कमी असतो.  
 

4 अॅनिमिया - भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते. यात उपस्थित आयरन हिमोग्लोबिनचे निर्माण करण्यास सहायक असतो आणि विटामिन- के, रक्तस्त्रावाला रोखण्याचे काम करतो.  
webdunia
5 पचन तंत्र - भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. यात उपस्थित लसदार फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.

6  हाड मजबूत होतात - भेंडीत आढळणारा लसदार पदार्थ आमच्या हाडांसाठी फारच उपयोगी असतो. यात असणारे व्हिटॅमिन-के हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मददगार असतात.   
webdunia
7  इम्यून सिस्टम - भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते. याला भोजनात सामील केल्याने बरेच आजारपण जसे खोकला, थंडीचा त्रास कमी होतो.  
 

8 डोळ्याची रोशनी - भेंडी व्हिटॅमिन-ए, बीटा कॅरोटीन आणि एंटी-ऑक्सीडेंट्सने भरपूर असते, जी सेल्युलर चयापचयाने उत्पन्न झालेले   मुक्त कणांना समाप्त करण्यात सहायक असते. हे कण नेत्रहीनतेसाठी जबाबदार असतात. त्याशिवाय भेंडी मोतियाबिंदूपासून देखील तुमचा बचाव करते.  
webdunia
9 गर्भावस्थेत भेंडीचे सेवन लाभदायक आहे. भेंडीत फोलेट नावाचा एक पोषक तत्त्व असतो जो गर्भाच्या मस्तिष्काचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्याशिवाय भेंडीत बर्‍याच प्रकारचे पोषक तत्त्व आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.  
 
webdunia
10 भेंडी तुमचे वजन कमी करण्यात मदत करते तसेच तुमच्या त्वचेला यंग बनवून ठेवते. याचा प्रयोग केल्याने केस सुंदर, दाट आणि चमकदार बनतात. यात असणारा लसदार पदार्थाला लिंबासोबत शँपूसारखे वापरू शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चव दक्षिणेची : मीन पीरा