हिवाळ्यात सकाळी आल्याच्या चहा मिळाल्यावर दिवसभर ताजेतवाने राहतो आरोग्य देखील चांगले राहते. सर्दी-पडसं असो किंवा घसा खवखवत असेल आलं सर्व त्रासांवर अचूक उपाय आहे. सर्दी पडसं दूर करण्या शिवाय आलं इतर आजारात देखील फायदेशीर आहे. चला तर मग आल्याचे इतर फायदे देखील जाणून घेऊ या.
1 वजन कमी करत -
आल्यामध्ये थर्मोजनिक एजंट असतात जे चरबी जाळण्याचे काम जलदगतीने करतात. या मुळे वजन कमी होत.
2 कोलेस्ट्राल पातळी कमी करत-
दररोज आल्याचा एक तुकडा कोलेस्ट्राल पातळी कमी करण्यात मदत करत. याच बरोबर हे हृदय विकारांशी निगडित कोणतेही आजारापासून संरक्षण करण्याचे काम करत.
3 मुरुमांना प्रतिबंधित करत -
आल्यामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मुरुमांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते.
4 दात मजबूत करतात-
आल्यामध्ये फॉस्फोरस असत जे दातांना बळकट करण्याचे काम करत. यामुळे हिरड्यांशी निगडित कोणतेही त्रास उद्भवत नाही.
5 गुडघ्याच्या वेदना कमी करतो-
आल्यामध्ये असे अनेक घटक आढळतात जे शरीराला बऱ्याच रोगांपासून बचाव करण्यास मदत करतात. या सह हे गुडघेदुखी पासून बचाव करण्याचे काम करते.