जगभरात जपानी लोक दीर्घायुष्य आणि निरोगपणाबाबत प्रसिद्ध आहेत. यामागे आरोग्यदायी वातावरण, सकस आहार, व्यायाम आणि स्वच्छतेच्या सवयी अशी काही कारणे आहेत. याखेरीज नियमित गरम पाण्याने स्नान करण्याचाही हा परिणाम आहे, असे मानले जात आहे.
सुमारे 80 टक्के जपानी लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. ते बराचकाळ गरम पाण्यात असतात.
शिन्या हायसाका हे डॉक्टर असून अध्यापनाचे कार्य करतात. गेल्या दोन दशकांपासून ते नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गरम पाण्याच्या स्त्रोतांचा मानवी आरोग्यावर झालेल्या परिणामांचा शोध घेत आहेत.
हायासाका यांचा पहिला पेपर द जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये मे 1991 मध्ये प्रसिद्ध झाला. यात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या निमित गरम पाण्याने स्नान करण्याच्या सवयींचा अभ्यास केला गेला. त्यांनी संशोधनाची व्याप्ती वाढवली आणि जपानमधील लोकांच्या दररोजच्यास्नानाचा अभ्यासात समावेश केला.
जपानमध्ये गरम पाण्याचे सुमारे 27 हजार नैसर्गिक स्रोत आहेत. प्राचीन काळी ते सर्वांसाठी खुले होते. त्यामुळे गरम पाण्याने स्नान करणे हा त्या देशातील संस्कृतीचा भाग ठरला.
प्रदूषणामुळे शरीरावर होणारे परिणाम दूर करण्यासाठी गरम पाण्याने केलेले स्नान उपयुक्त आहे.
आपल्याकडे पूर्वी उन्हाळ्यात तांब्याच्या घागरीचे तोंड कापडाने बंद करुन ती उन्हात ठेवली जायची आणि त्यातील पाणी तापल्यावर त्या पाण्याने मुलांना स्नान घातले जायचे. या स्नानामुळे उन्हाळा बाधत नाही, असे सांगितले जायचे. दुर्दैवाने, आता हा प्रकार कुठे दिसत नाही.