Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यामध्ये थंड दूध पिल्यास मिळतात अनेक फायदे

Milk
, शुक्रवार, 7 जून 2024 (07:00 IST)
सामान्यतः अनेक लोक आपल्या दिवसाची सुरवात करून तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आपल्या डाएटमध्ये सहभागी करतात. पण तुम्हाला माहित आहे का? उन्हाळ्यामध्ये गरम दुधापेक्षा थंड दूध खूप फायदेशीर असते. 
 
जर तुम्ही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल किंवा रक्तचापने तुमच्या समस्या वाढवल्या असतील तर तुम्ही फ्रीजमधून एक ग्लास दूध नक्कीच पिऊ शकतात. दुधाला संपूर्ण आहार मानला जातो. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, फास्फोरस सारखे पोषकतत्वे असतात. जे शरीरातील हाडे मजबूत करतात. तुम्हाला माहित आहे का? थंड दूध पिल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात तर चला जाणून घेऊ या. 
 
एसिडिटी पासून अराम- 
जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये एसिडिटी होत असेल तर तुम्ही नक्कीच थंड दुधाचे सेवन करावे. थंड दूध पोटाला नियंत्रित ठेवते. तसेच दुधामध्ये असलेले कॅल्शियम एक्स्ट्रा एसिडला अवशोषित करून एसिड निर्माण होण्यापासून थांबवते. 
 
मानसिक तणाव दूर ठेवते-
थंड दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन B12 चे चांगले प्रमाण रक्ताला पोषित करून ऊर्जा प्रदान करतात. थंड दूध घेतल्यास मानसिक नाव दूर होतो. 
 
वजन कमी होते- 
जर तुम्हाला वजन कमी करायचे असले तर थंड दूध नक्कीच प्यावे. कारण थंड दूध पिल्याने मेटॅबोलजीम बूस्ट होते. तसेच अनावश्यक कॅलरीस कमी होतात व खूप वेळपर्यंत पॉट भरलेले जाणवते. ज्यामुळे व्यक्तीला भूक लागत नाही. व  वजन कमी करण्यास मदत होते. 
 
उच्च रक्तचाप नियंत्रित ठेवते-
उच्च रक्तचापसाठी थंड दूध खूप फायदेशीर असते. थंड दूध पिल्याने ब्लड सर्कुलेशन चांगल्या प्रमाणात होते. कॅल्शियम, मॅग्नाशीयम, पोटॅशियम, उच्च रक्तचापला नियंत्रित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. 
 
त्वचेला मिळतो ओलावा(हाइड्रेशन)- 
थंड दूध पिल्याने त्वचेला हाइड्रेशन मिळते. ज्यामुळे त्वचा उजळते आणि आरोग्यदायी राहते. थंड दुधामध्ये व्हिटॅमिन A चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. जे त्वचेचे रक्षण करते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संध्याकाळी चहा सोबत टेस्टी लागतात किनोआ(Quinoa)कटलेट, लिहून घ्या रेसिपी