कोरोना टाळण्यासाठी लोकांना लस देण्यात येत आहे, पण आता नाकाची लस देखील चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींनीही सोमवारी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. ते काय आहे आणि नाकावाटे दिली जाणारी लस कशी प्रभावी ठरू शकते हे जाणून घ्या.
कशा प्रकारे कार्य करते नेझल वॅक्सीन?
नेझल स्प्रे वॅक्सीन इंजेक्शनऐवजी नाकाने दिली जाते. ही नाकाच्या आंतरीक भागात इम्युन तयार करते. हे अधिक प्रभावी मानले जाते कारण कोरोनासह बहुतेक हवा-जनित रोगांच्या संसर्गाचे मूळ प्रामुख्याने नाकाद्वारे असतं. आणि त्याच्या अंतर्गत भागांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार करून, अशा रोगांपासून बचाव करण्यासाठी ते अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होतं.
नेझल वॅक्सीनचे 5 फायदे
1. इंजेक्शनपासून मुक्ती
2. नाकाच्या आतील भागात प्रतिकारशक्ती वाढवून, श्वसन संसर्गाचा धोका कमी होईल
3. इंजेक्शनपासून मुक्त असल्यामुळे हेल्थवर्कर्सला ट्रेनिंगची गरज नाही
4. कमी जोखमीमुळे मुलांना लसीकरण सुविधा देखील शक्य
5. उत्पादन सुलभतेमुळे, जगभरातील मागणीनुसार उत्पादन आणि पुरवठा शक्य
बाजारात नाकाची कोणतीही लस उपलब्ध आहे का?
होय, आधीपासून इंफ्लूएंजा आणि नेझल फ्लूची नेझल वॅक्सीन्स अमेरिका सारख्या देशातील बाजारात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये केनेल कफसाठी कुत्र्यांना नाकातून लस दिली जाते. 2004 मध्ये, अँथ्रॅक्स रोगाच्या वेळी, आफ्रिकेत प्रयोग म्हणून माकडांना अनुनासिक लस दिली गेली. 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उंदीर आणि माकडांमध्ये केलेल्या प्रयोगांमध्ये आढळून आले की नाकाद्वारे लस दिल्याने विषाणूचा संसर्ग रोखता येतो. त्याच्या प्रभावामुळे, नाकाच्या आतील भागाच्या खालच्या आणि वरच्या भागात व्हायरल क्लीयरन्स अर्थात संरक्षण आढळले.