Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिरा कसा बनवायचा, शिर्‍याचे गोड फायदे जाणून घ्या

Halwa Recip benefits
, शनिवार, 25 जून 2022 (08:48 IST)
गोड शिरा सर्वांना आवडतो? जाणून घ्या शिरा बनवण्याची सोपी कृती आणि शिर्‍या खाण्याचे फायदे जाणून घ्या- 
 
सामुग्री : 250 ग्रॅम गव्हाचं पीठ, 200 ग्रॅम साखर, 2 मोठे चमचे साजुक तुप, अर्धा लहान चमचा वेलची पावडर, सुखे मेवे आवडीप्रमाणे.
 
कृती : एका कढईत तुप गरम करुन गव्हाचं पीठ गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. एक वेगळ्या भांड्यात पाणी गरम करुन शेकलेल्या पिठात धार सोडत हालवत राहा. नंतर वाफ येऊ द्या. जरा घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला. पुन्हा दोन-तीन वेळा वाफ येऊ द्या. नंतर वेलची पावडर घालून हालवून घ्या. सर्व्ह करताना सुके मेवे टाका. 
 
शिरा खाण्याचे फायदे-
 
1 रव्‍याचं शिरा बनवत असाल तर जाडा रवा घ्यावा ज्याने पचनात त्रास  होत नाही.
 
2 गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत असाल तर जाड पीठ घ्यावं याने शिरा कढईला चिकटणार नाही आणि स्वाद व पचन दोन्हींसाठी फायदेशीर ठरेल. हे मेंदूला ताजेतवाने करतं.
 
3 जर आपणास हानी टाळायची असेल तर डालडा किंवा बाजाराच्या तुपाऐवजी घरी तयार साजुक तूप किंवा शुद्ध गाय तूप वापरा. शुद्धात तूपात केलेला शिरा त्रिदोषांना संतुलित करतो.
 
4 शिरा सूर्योदयापूर्वी उठून मुख स्वच्छ करुन गरमा-गरम तयार करुन सेवन करणे अधिक फायद्याचं ठरतं.
 
5 शिरा थंड करुन खाऊ नये. गरमागरम शिरा खाल्ल्याने डोकेदुखी किंवा न्यूरो व्हॅस्क्युलर डिसऑर्डर सारख्या समस्यांवर फायदा होतो.
 
6 शिरा खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, नाहीतर पचण्यास त्रास होऊ शकतो. अर्ध्या तासाने पाणी प्यावं.
 
7 शिरा पचण्यात हलकं असतो, म्हणून शस्त्रक्रियेनंतर, प्रसूतीनंतर, अशक्तपणामध्ये, आजारातून बरे होण्यामध्ये आणि वजन कमी असलेल्या लोकांना देखील दिला जाऊ शकतो.
 
8 शक्तीसाठी शिर्‍यात केशर, वेलची, सुके मेवे टाकतात.
 
9 शुद्ध तुपात तयार शिरा शरीराला निरोगी बनवण्यात मदत करतं.
 
10 साखरेऐवजी गूळ वापरल्यास आरोग्य आणि स्वाद दोन्ही बाबतीत फायदा मिळेल. आपल्या साखर वापरायची असेल तर ब्राउन शुगर वापरु शकता. 
 
टीप: मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

career In Hemothpathy : होमिओपॅथी मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, नौकरीच्या संधी जाणून घ्या