Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय होते रडल्यामुळे?

काय होते रडल्यामुळे?
आपल्याकडे रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. मनाने कमकुवत असणारे लोक रडतात, असा समज आहे. पण प्रत्यक्षात मानसिक आरोग्यासाठी रडणे चांगले असते. रडल्यामुळे मन हलके होते. ताण कमी व्हायला मदत होते. अश्रूंच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणारे लोक इतरांच्या टिकेला घाबरत नाहीत. इतरांपुढे व्यक्त होतानाही त्यांना भीती वाटत नाही. छोट्या- छोट्या गोष्टींसाठी रडणार्‍या लोकांचे आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण असते. असे लोक इतरांच्या भावना लवकर समजून घेतात. अर्थात असे असले तरी सतत रडत बसणे योग्य नाही. रडण्यालाही मर्यादा असायला हवी. सतत रडत राहणार्‍यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुधाने होतात केस स्ट्रेट, जाणून घ्या इतर 7 घरगुती उपाय