Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्वचेवर पांढरे डाग का येतात? त्यावर उपाय काय?

त्वचेवर पांढरे डाग का येतात? त्यावर उपाय काय?
- मृगेश मदाकान्नू
कोड हा एक त्वचारोग आहे. भारतात तो मोठ्या प्रमाणात आढळतो. National Institute of Health नुसार गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये कोड असण्याचं प्रमाण 0.25 ते 4% आहे. कधीकधी हे प्रमाण 8.8% होतं.
 
कोडमुळे काही लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. त्यांना समाजाकडून झिडकारलं जातं आणि त्यामुळे त्यांना नैराश्य येतं.
 
या लेखाच्या माध्यमातून कोडविषयी अधिक माहिती घेऊया, ते का उठतं, त्यावर उपाय काय ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
 
कोड काय असतं? ते का उठतं?
शरीरातील प्रतिकारकशक्ती शरीराच्या विरुद्ध उठाव करायला गेलं की कोड उठतं असं त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. दिनेश कुमार सांगतात.
 
“सगळ्या वयातल्या लोकांना त्वचेवर पांढरे डाग य़ेऊन शकतात. कोडामुळे त्वचेचा रंग ठरवणाऱ्या पेशी म्हणजेच मेलॅनोसाईट्स नष्ट होतात.
 
मॅलानोसाईट्स मॅलानिन नावाचं द्रव्य तयार करतात. त्यामुळे त्वचेला रंग येतो. या पेशी नष्ट झाल्या की त्वचेवर पांढरे चट्टे येतात. असं ते पुढे म्हणाले.
 
कोड का उठतं याचं ठोस कारण अद्याप समजलेलं नाही.दिनेश यांच्या मते कोड का उठतं याच्या तीन थिअरीज आहेत.
 
नेमकं कारण काय?
मेलॅनोसाईट्स मुळे मेंदूसंस्थेतसुद्धा बिघाड होतो. काही तज्ज्ञांच्या मते मेलॅनोसाईट्स स्वत:चंच नुकसान करतात.
 
काही वेळेला शरीर शरीरातलीच एखादी पेशी बाहेरची वस्तू म्हणून नाकारते. याला स्वयंप्रतिकारक प्रतिसाद असं म्हणतात. त्यामुळे मेलॅनोसाईट्सचं नुकसान होऊ शकतं.
 
दिनेश यांच्या मते काही लोकांना वांशिक आजारामुळे कोड उठतं. “थायरॉईड, डायबेटिस, अनिमिया हे आजार सुद्धा होऊ शकतात.”
 
“तणावामुळेसुद्धा त्वचेवर डाग पडतात.” ते म्हणतात.
 
पांढऱ्या डागाचे प्रकार
पांढरे डाग शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येऊ शकतात. कोणत्या भागावर ते डाग येतात त्यानुसार त्यांची वर्गवारी ठरते.
 
ओठ, बोटं आणि घोट्यावर डाग येतात त्याला Lip tip vitiligo असं म्हणतात.
 
शरीराच्या एका भागावर येणाऱ्या डागांना Segmental vitiligo असं म्हणतात.
 
काही वेळेला संपूर्ण त्वचेला असे डाग पडतात आणि त्वचा पूर्णपणे पांढरी होते.
 
तसंच ओठांच्या आतल्या भागातही पांढरे डाग येतात. काही वेळा गुप्तांगाच्या आत सुद्धा पांढरे डाग पडतात. त्यांना Mucosal vitiligo असं म्हणतात.
 
पांढऱ्या डागांसाठी उपचार काय?
पांढऱ्या डागांवर उपचार काय असा प्रश्न आम्ही डॉ.दिनेश यांना विचारला. ते म्हणाले, “क्रीम आणि औषधं हा एक उपाय आहे. त्यामुळे रोगाचा प्रसार थांबतो आणि त्वचेचा रंग परत येण्यास सुरुवात होते.”
 
UV Therapy हा आणखी उपचार आहे. या उपचारपद्धतीत ज्या भागावर डाग पडले त्यावर अतिनील किरणांचा मारा केला जातो.
 
तिसरा उपाय हा सर्जरी असतो. यामध्ये ज्या भागावर कोड आहे तो भाग काढला जातो आणि त्या भागावर रंग असलेला त्वचेचा भाग चिकटवला जातो.
 
त्याला स्कीन ग्राफ्टिंग असं म्हणतात. मात्र पांढरे डाग पसरायचे थांबल्यावरच हे उपचार केले जातात असंही ते पुढे म्हणाले.
 
पूर्णपणे बरा होत नाही
पुढे बोलताना ते म्हणाले, “पांढरे डाग हा स्वयंप्रतिकारक रोग आहे, त्यामुळे तो पूर्णपणे बरा होत नाही.”
 
अनेकदा उपचार केल्यावर ते पुन्हा येतात. उपचारामुळे त्याचा प्रसार थांबतो.
 
त्यामुळे उपचार थांबवल्यावर हा रोग पुन्हा उफाळू शकतो. त्यामुळे सुरुवातीलाच उपचार करून हा प्रसार थांबवता येतो. योग्य उपचार केल्यास हे डाग शरीराच्या इतर भागात पसरत नाही.
 
अनेक लोकांना असा गैरसमज आहे की पांढरे डाग हा साथीचा रोग आहे. मात्र पांढऱ्या डागांची साथ येणार नाही हे निश्चित असं डॉ.दिनेश म्हणतात.
 
आजी आजोबांना डाग असतील तर आम्हालाही येतील का अशी भीती अनेकांना वाटते पण पांढरे डाग हे साथीचे नसतात. त्यामुळे त्यांच्यात मिसळायला अजिबात हरकत नाही. या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता पसरवायला हवी असाही सल्ला ते देतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Anarkali फॅशन 'अनारकली'ची