Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेवण्यातच नव्हे, तर कांद्याचे इतर 5 फायदे जाणून घ्या

जेवण्यातच नव्हे, तर कांद्याचे इतर 5 फायदे जाणून घ्या
, सोमवार, 18 जानेवारी 2021 (19:06 IST)
घरात जेवण बनत आहे आणि त्यात कांद्याचा वापर होणार नाही असं शक्यच नाही. जेवण बनवताना कांदा हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कांदा हा भारतातच नव्हे तर परदेशात देखील चवी साठी वापरला जातो.चव वाढविण्यासाठी कांदा वापरला जातो. पण आम्ही सांगू इच्छितो की कांदा हा खाण्यासाठीच नव्हे तर इतर गोष्टींसाठी देखील वापरतात. 
कांद्याचा वापर हा स्वच्छतेसाठी, वास दूर करण्यासाठी आणि इतर लहान गोष्टींसाठी केला जातो. अशा काही हॅक्स बद्दल जाणून घेऊ या.
 
1 चिरलेल्या कांद्याने घाणेरडा वास काढू शकता-
नेहमी आपण ऐकले आहे की कच्चा कांदा खाल्ल्यानं तोंडाचा वास येतो, पण आपल्याला हे माहित आहे का,की या मुळे वास दूर करता येतो.वास्तविक कांदा ज्याला मुळात वास येतो तो एखाद्या घाण वासाला शोषू शकतो.जर आपल्या तळघरात, बुटांच्या रॅक मध्ये ओलसर वास किंवा घामाचा वास आणि चामड्याचा वास येतं असेल तर या ठिकाणी आपण अर्धा कांदा चिरून ठेवा. कांदा तिथली सगळी वास शोषून घेण्यास सक्षम आहे हे फक्त 1 रात्र ठेवा आणि आपले काम पूर्ण होईल. पावसाळ्यात हे फार प्रभावी आहे.
 
2 अवाकाडो साठविण्यासाठी कांदा वापरा-
कांद्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. अवाकाडो सारखे विचित्र फळे साठविण्यासाठी करतात.अवाकाडो लवकर तपकिरी रंगाचा होतो.बऱ्याच वेळा लोक ह्याला एकाच वेळी संपविण्यात अक्षम असतात. ह्याची किंमत जास्त असते म्हणून हे काही दिवसांसाठी ठेवणे योग्य आहे. अवाकाडो खराब होऊ नये या साठी आपण एक युक्ती करू शकता. कांदा अर्धा चिरून अवाकाडो जवळ ठेवून  एखाद्या काचेच्या पात्रात ठेवू शकता. असं केल्याने अवाकाडो सडणार नाही आणि कांद्यामध्ये असलेले सल्फर ह्याला खराब होण्यापासून वाचवेल.
 
3 घामाचे डाग काढण्यासाठी कांदा वापरा- 
एखाद्या पांढऱ्या कपड्यांवर किंवा टीशर्ट वर घामाचे डाग लागले असतील तर ते पिवळे होतात असं विशेषतः पांढऱ्या टी शर्ट च होत आणि तो भाग पिवळा दिसू लागतो. जर आपल्या कपड्यांवर देखील असं झाले असेल तर या साठी  कांदा अर्धा चिरून कपड्यावर घासून घ्या आणि थोड्यावेळ सुकू द्या नंतर धुऊन घ्या. कपड्यावर हट्टी डाग काढण्यासाठी ही सोपी युक्ती आहे.
 
4 गंजलेले डाग काढण्यासाठी कांदा वापरा-
जर एखाद्या चाकू किंवा कात्रीला गंज लागला आहे किंवा ते फारच घाण झाले आहेत तर त्याला साबणाने धुणे योग्य नाही. या साठी आपण अर्धा कांदा गंजलेल्या डागावर लावून ठेवावं नंतर धुवावे. . अशा प्रकारे आपण कोणत्याही गंजलेल्या डागांना काढण्यासाठी ह्याचा वापर करू शकता.   
 कांद्यामध्ये असलेले सल्फर या वर प्रतिक्रिया करतो आणि अशा परिस्थितीत डाग फिकट होऊ लागतात. आपली इच्छा असल्यास कांद्याच्या ठिकाणी रस्ट क्लीनर चा वापर करू शकता, पण प्रथम आपण कांदा वापरून बघा. या मुळे आपला बराच वेळ वाचेल.
 
5 डास आणि माशा घालविण्यासाठी कांदा वापरा -
आपण कांदा माशी आणि डास घालविण्यासाठी देखील वापरू शकता. या साठी आपल्याला कांदा शरीरावर घासायच आहे. जर आपण कुठे बाहेर जात असाल आणि त्या ठिकाणी बरेच कीटक असतील तर आपण आपल्या जवळ चिरलेला कांदा आपल्या गळ्या जवळ किंवा हाताला आणि पायावर चोळून घ्या. असं केल्यानं आणि  तळपायावर कांदा चोळल्याने शरीराचे तापमान देखील नियमित राहतो सर्दी किंवा हंगामी ताप येत असेल तर तो ही काही प्रमाणात बरा होतो.    
आपण कांद्याचा वापर केसांसाठी देखील करावा कारण कांद्याने बनलेले हेयर पॅक देखील खूप कामाचे असतात..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यात गरोदर स्त्रियांनी या गोष्टींची काळजी घ्यावी